मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aryan Khan ला जामीन मिळताच अबरामने हात उंचावत चाहत्यांना दिला प्रतिसाद; VIDEO पाहून सर्वांना झाली शाहरुख ची आठवण

Aryan Khan ला जामीन मिळताच अबरामने हात उंचावत चाहत्यांना दिला प्रतिसाद; VIDEO पाहून सर्वांना झाली शाहरुख ची आठवण

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गेल्या ३ ऑक्टोबरला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. एका हाय प्रोफाईल क्रूसवर होणाऱ्या ड्रग्स पार्टीत आर्यनला ही अटक झाली होती.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गेल्या ३ ऑक्टोबरला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. एका हाय प्रोफाईल क्रूसवर होणाऱ्या ड्रग्स पार्टीत आर्यनला ही अटक झाली होती.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गेल्या ३ ऑक्टोबरला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. एका हाय प्रोफाईल क्रूसवर होणाऱ्या ड्रग्स पार्टीत आर्यनला ही अटक झाली होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,29ऑक्टोबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मोठा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) काल अखेर जामीन मंजूर झाला. त्यांनतर शाहरुख खानच्या कुटुंबीयांनी विविध पद्धतीने आपला आनंद व्यक्त केला आहे. बहीण सुहाना खानने आपल्या इन्स्टाग्रामवर एक बापणीचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. तर लहान भाऊ अबरामनं (Abram Khan) आपल्या बाल्कनीतून पिता शाहरुखसारखं हात उंचावत अभिवादन केलं आहे.

नुकताच ट्विटरवर ANI ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शाहरुख खानचा लहान मुलगा आणि आर्यन खानचा भाऊ अबराम खानचा आहे. छोट्याश्या अबरामचा हा व्हिडीओ सध्या कौतुकाने पाहिला जात आहे. अनेकांना त्याच्यामध्ये शाहरुखची झलक भासत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतरचा आहे. यावेळी शाहरुखच्या घराबाहेर चाहत्यांची आणि पापाराझींची गर्दी जमली होती. दरम्यान शाहरुख खानचा लहान मुलगा अबराम खान बाल्कनीत असलेला दिसून आला. यावेळी त्याच्यासोबत त्याचे दोन चिमुकले मित्रसुद्धा होते. आश्चर्य म्हणजे यावेळी अबराम आनंदाने आपल्या वडिलांचे चाहते आणि पापाराझींना हात उंचावून प्रतिसाद देत होता.

यावेळी अबराम खान फारच आनंदी दिसत होता. अबराम बराच वेळ बाल्कनीतून हात उंचावून प्रतिसाद देत होता. त्याला आत नेण्यात येत होतं. मात्र हा पट्ट्या चाहत्यांना पाहून एकसारखं हात उंचावत होता. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना शाहरुख खानची आठवण येत आहे. शाहरुख खान ज्याप्रमाणे आपल्या चाहत्यांना येऊन हात उंचावून अभिवादन करतो. अगदी असंच काहीसं दृश्य अबरामसोबत पाहायला मिळालं. त्यामुळे चाहत्यांना शाहरुखची आठवण होत आहे. अबराम खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सर्वांनाच या चिमुकल्याचं आश्चर्य आणि कौतुक वाटत आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गेल्या ३ ऑक्टोबरला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. एका हाय प्रोफाईल क्रूसवर होणाऱ्या ड्रग्स पार्टीत आर्यनला ही अटक झाली होती. आर्यन सोबतच इतर सात लोकांना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं होतं. यामध्ये आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेजा यांचाही समावेश होता. या प्रकरणामध्ये सातत्याने नवनवीन खुलासे होत होते. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच गंभीर बनलं होतं. इतकंच नव्हे तर अभिनेत्री अनन्या पांडेच नावसुद्धा यामध्ये आलं होतं. अनन्या आणि आर्यन खानचे व्हॉट्सअप चॅट्स समोर आल्यांनतर या प्रकरणाला एक नवं वळण लागलं होतं. त्यामुळे आर्यन खानची जामीन पुढे ढकलण्यात येत होती. मात्र काल अखेर त्याचा जामीन मंजूर करण्यात आला.

First published:

Tags: Aryan khan, Entertainment