जेव्हा अनुष्का शाहरूखला चकित करते...

जेव्हा अनुष्का शाहरूखला चकित करते...

'जब हॅरी मेट सेजल'ची दोन मिनी ट्रेलर्स त्यानं रविवारी आणि आज रिलीज केली.

  • Share this:

19 जून : आजकाल चित्रपट हिट व्हावा म्हणून निर्माते नवनवीन शकली लढवत असतात .आता इम्तियाझ अलीनंही अशीच एक शक्कल लढवलीय. 'जब हॅरी मेट सेजल'ची दोन मिनी ट्रेलर्स त्यानं रविवारी आणि आज रिलीज केली.

हे मिनी ट्रेलर शाहरूख आणि अनुष्काच्या पात्रांचे वेगवेगळे पैलू  उलगडत आहेत. पहिल्या ट्रेलरमध्ये शाहरूख  आपण  अत्यंत चीप आहोत,  असं अनुष्काला सांगताना दिसतो.  तर दुसऱ्या ट्रेलरमध्ये याच गोष्टीची री आोढत अनुष्का त्याला उत्तर देताना दिसते.

तसंच अनुष्का झकास गुजराथी हिंदीत बोलतेय.तिनं शाहरूखच्या 'चीप'पणावर रामबाण इलाज शोधलाय. या ट्रेलरवरून तरी  हा चित्रपट एक रोमॅंटिक कॉमेडी वाटतोय.

या चित्रपटात  अनुष्का तिची हरवलेली रिंग शोधतेय.आणि ती शोधता शोधता तिला आयुष्य बदलणारं नवं प्रेम मिळतं असं कथानक आहे.या रिंगच्या शोधामुळेच  सिनेमाचं नाव आधी 'द रिंग' ठेवायचं ठरलं होत.बहुतेक या चित्रपटाला 'जब वी मेट शी' जोडायची दिग्दर्शकाची इच्छा दिसते, म्हणून नाव बदललंय.

First published: June 19, 2017, 4:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading