पाकिस्तानी मालिका पाहून आलिया भटनं केली 'कलंक'ची तयारी

पाकिस्तानी मालिका पाहून आलिया भटनं केली 'कलंक'ची तयारी

आलियानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियानं कलंकची तयारी कशी केली याचा खुलासा केला.

  • Share this:

मुंबई, 09 एप्रिल : अभिनेत्री आलिया भटची मुख्य भूमिका असलेला कलंक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या सिनेमातील आलियाचा लूक आणि तिची बोलण्याची ढब या सर्व गोष्टींचं सध्या सर्वत्र कौतुक सुरु आहे. पण यासाठी आलियाला विशेष मेहनत घ्यावी लागली. कलंक मधील लूक आणि बोलण्याची ढब या गोष्टी आत्मसात करण्यासाठी दिग्दर्शक अभिषेक वर्मन यानं आलियाला 'मुघल-ए-आझम' आणि 'उमराव जान' हे सिनेमा आणि पाकिस्तानी मालिका 'जिंदगी गुलजार है' ही मालिका पाहायला सांगितली होती. ही मालिका पाकिस्तान सोबतच भारतातही खूप प्रसिद्ध झाली होती. यात फवाद खान आणि सनम सईद यांच्या मुख्य भूमिका आहेत.

 

View this post on Instagram

 

Kalank Title Track - Out Tomorrow ♥️

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

आलियानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियानं कलंकची तयारी कशी केली याचा खुलासा केला. आलिया म्हणाली, मी माझी भाषा आणि बॉडी लँग्वेज सुधारण्यासाठी अनेक जुने सिनेमे पाहिले कारण मला या सिनेमामध्ये उर्दू भाषा बोलायची होती. यासाठी अभिषेकनं मला पाकिस्तानी मालिकाही पाहायला सांगितल्या होत्या. या सिनेमातील माझी भूमिका काहीशी अशीच लिहीली गेली आहे. ही भूमिका तुम्हाला नेहमीच खूश दिसणार नाही.

आलिया पुढे म्हणाली, जेव्हा मी माझा पहिला सिनेमा स्टुडंट ऑफ द इयरचं प्रमोशन करत होते त्यावेळी मी पहिल्यांचा कलंकची कथा ऐकली होती. त्यावेळी ही कथा मला थोडी वेगळी वाटली. अभिषेकनं ही कथा त्याच्या हिशोबानं अपडेट केली. त्यानंतर काही महिन्यांनी मला जाणवलं की ही कथा फक्त माझी भूमिका डोळ्यासमोर ठेवूनच लिहिली गेली आहे. कलंकमध्ये आलिया भट 'राजकुमारी रुप'ची भूमिका साकारत असून यात आलिया व्यतिरिक्त वरुण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर आणि कुणाल खेमू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

First published: April 9, 2019, 9:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading