अभिषेक अजुनही 'स्ट्रगल' करतोय - जया बच्चन

अभिषेक अजुनही 'स्ट्रगल' करतोय - जया बच्चन

चित्रपटसृष्टीत घराणेशाही नाही, माझा मुलगा अभिषेक अजूनही संघर्ष करतोय, अशी कबूली ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी दिलीय. अमिताभला राजकारण

  • Share this:

मुंबई, 29 एप्रिल : चित्रपटसृष्टीत घराणेशाही नाही, माझा मुलगा अभिषेक अजूनही संघर्ष करतोय, अशी कबूली ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी दिलीय. इंडियन एक्स्प्रेसला देलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. ऐश्वर्या रायबाबतही त्यांनी मत व्यक्त केलं. ऐश्वर्य अति काळजी करणारी आई आहे. मी घरी असते पण तिची आई नसते.. म्हणून मग सगळं तिलाच करायचं असतं, असं जया म्हणाल्या.

कुठे आलीय घराणेशाही?

दुरून डोंगर साजरे असतात. मला चित्रपटाची पार्श्वभूमी नव्हती पण मला संघर्ष करावा लागला नाही. मी भाग्यवान होते. माझ्या पतीला संघर्ष करावा लागला आणि मुलगा तर अजूनही संघर्ष करतोय. चित्रपटसृष्टीतले आहात म्हणून कदाचित तुम्हाला पहिला चित्रपट मिळेल. पण आम्ही आमच्या मुलासाठी कधीच चित्रपटाची निर्मिती केली नाही. अनेक लोकांची अनेक मुलं अजूनही प्रतीक्षेत आहेत. म्हणून ते (घराणेशाहीचे आरोप) खरे नाहीत.

ऐश्वर्या जरा जास्तच काळजी करेत

ऐश्वर्या तिच्या मुलीची अति काळजी करते. मुलीला ती एक सेकंदही एकटं सोडत नाही. सगळं तिलाच करायचं असतं. तिला जमेल तसं ती चित्रपटात कामही करते. पण आयांची ही नवी पिढी अशीच आहे, त्या अति काळजी करतात. मीही आई आहे पण मी त्यांच्यासारखी कधीच नव्हते. त्यांना अंघोळ घालायची असते, जेवण भरवायचं असतं, वाचून दाखवायचं असतं. मीही करायचे पण प्रमाणात.

काळ बदलतो, गोष्टी बदलतात. हल्ली असुरक्षितपणा वाढलाय. एकत्र कुटुंबात राहिल्यामुळे आम्ही खूप सुरक्षित आयुष्य जगलो. नेहमी कुणीतरी असायचंच. पण ऐश्वर्याकडे पर्याय नाही. मी असते पण तिची आई नेहमीच असते असं नाही. आज एकत्र कुटुंबपद्धती नाहीये. म्हणून आईवरच सगळी जबाबदारी येते.

अमिताभला राजकारण जमलं नाही

अमिताभला राजकारण जमलं नाही कारण तो त्याचा स्वभाव नव्हता. अभिनेते आणि राजकारणी यांना सतत लोकांमध्ये आणि लोकांसमोर राहावं लागतं. अनेक वादळांना तोंड द्यावं लागतं. अमिताभला हे काही रूचलं नाही.त्यामुळं तो त्यात रमला नाही. मी हे सगळं पचवलं आणि त्यामुळं अजुनतरी राजकारणात टिकून आहे.

 

 

First published: April 29, 2018, 11:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading