मुंबई, 4 डिसेंबर- अभिनेते मिलिंद गुणाजी (milind gunaji) आणि अभिनेत्री राणी गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी ( abhishek gunaji and radha patil engagement ) यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिषेकच्या भावी पत्नीचे नाव राधा पाटील आहे. अभिषेक गुणाजी हा देखील सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. सध्या सर्वांना प्रश्न पडला आहे मिलिंद यांची होणारी सून आणि अभिषेकची होणारी पत्नी काय करते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
अभिषेकने मुंबईतील रामनारायण रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याच्याशी त्याची खूप जवळची मैत्री आहे अनेकदा हे दोघेही मित्र एकत्रित पाहायला मिळतात. नुकतेच अभिषेक गुणाजीने त्याची गर्लफ्रेंड राधा पाटील हिच्यासोबत एंगेजमेंट केली आहे. अभिषेक आणि राधाची एंगेजमेंट अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सध्या या दोघांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वाचा : Good Vibes 2021 : यंदा या चार मराठी मालिका Googleवर केल्या गेल्या सर्वात जास्त सर्च !
राधा आणि अभिषेक लवकर ते दोघे लग्नही करणार आहेत. राधा पाटील ही मेडिकल क्षेत्रात कार्यरत आहे. तर अभिषेक गुणाजी आपल्या आई वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात न येता दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमाऊ पाहत आहे. दिसायला अतिशय देखणा असलेल्या अभिषेकला फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे मात्र त्याने दिग्दर्शन क्षेत्रात आपले पाऊल टाकले आहे. गेल्या वर्षी त्याने ‘छल’ या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन केले होते ज्यात सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.
बर्लिन फ्लॅश फिल्म फेस्टिवलमध्ये देखील विशेष नामांकन मिळाले होते. याशिवाय आपलं कर्जत जामखेड या भटकंती सिरीजचे दिग्दर्शनही त्याने केले. नुकतीच टीव्हीसी पाईपच्या जाहिरातीसाठी दिग्दर्शनाची भूमिका त्याने पार पडली आहे, सुपर टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे तो भाग्य समजतो.
View this post on Instagram
मिलिंद गुणाजी यांना तुम्ही अनेक मराठी हिंदी चित्रपटातून पाहिले आहे. मराठी ट्रॅव्हल शो मधूनही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. मॉडेलिंग आणि अभिनया सोबत गडकिल्ले भटकंती मालिकेचे अप्रतिम सूत्रसंचालन त्यांनी केले होते. महाराष्ट्रातील किल्ले, लेण्या आणि पुरातन मंदिरांचे दर्शन त्यांनी रसिक प्रेक्षकांना ‘भटकंती’ या ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून घडविले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.