ट्विटरनंतर अभिषेक बच्चनचं इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक

ट्विटरनंतर अभिषेक बच्चनचं इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक

अभिषेकचं इन्स्टाग्रामवरचं अकाऊंट हॅक करून हॅकर्सनी त्यावरून काही फोटोही पोस्ट केले आहेत. तसंच आय लव्ह यू कतरिना कैफ असंही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लिहिण्यात आलं होतं.

  • Share this:

11 फेब्रुवारी : अभिनेत्यांचं सोशल मीडियावरचं अकाऊंट हॅक होणं हे काही नवं नाहीये आणि आता हॅकर्सनं लक्ष्य केलंय  अभिषेक बच्चनला. ट्विटर अकाऊंट हॅक करून झाल्यानंतर आता त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक केलं आहे.

अभिषेकचं इन्स्टाग्रामवरचं अकाऊंट हॅक करून हॅकर्सनी त्यावरून काही फोटोही पोस्ट केले आहेत. तसंच आय लव्ह यू कतरिना कैफ असंही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लिहिण्यात आलं होतं. एका फोटोत अमिताभ यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली आणि मागून अभिषेक अमिताभ बच्चन यांच्यावर डोळे वटारून पाहत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

तसंच हॅकर्सनं अभिषेकच्या अकाऊंटवरून पॅलेस्टाइनचा झेंडाही पोस्ट केला आहे. अभिषेकच्या हे लक्षात येताच, त्यानं स्वतःच्या अकाऊंटची हॅकर्सच्या तावडीतून सुटका करून घेतली आहे. आणि हॅकर्सनी पोस्ट केलेले फोटोही काढून टाकले आहेत.

First published: February 11, 2018, 3:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading