सिंबासाठी रणवीर सिंग नाही, 'हा' कलाकार होता पहिली पसंती

रणवीर-दीपिकाच्या लग्नाबरोबर अजून एक जोरदार चर्चा आहे ती सिंबा सिनेमाची. सिंबा सिनेमा धमाकेदार आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 13, 2018 07:11 AM IST

सिंबासाठी रणवीर सिंग नाही, 'हा' कलाकार होता पहिली पसंती

मुंबई, 13 नोव्हेंबर : रणवीर-दीपिकाच्या लग्नाबरोबर अजून एक जोरदार चर्चा आहे ती सिंबा सिनेमाची. सिंबा सिनेमा धमाकेदार आहे. त्याचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलंय. पण रणवीर हा रोहितचा पहिला चाॅइस नव्हताच मुळी!


सिंबा हा सिनेमा टेंपर या दाक्षिणात्य सिनेमावर बेतलाय. या सिनेमाचा मूळ दिग्दर्शक पुरी जगन्नाथनं अभिषेक बच्चनला हिरोच्या भूमिकेसाठी विचारलं होतं. त्यानंतर सिनेमा हिंदीत बनत असताना रोहित शेट्टीनं अभिषेकला निगेटिव्ह रोलसाठी विचारलं होतं. पण त्यानं नकार दिला.


त्यानंतर रोहितनं नकारात्मक भूमिकेसाठी आर. माधवनला विचारलं होतं. पण माधवनला झालेल्या दुखापतींमुळे तो बाजूला झाला आणि सोनू सुद फायनल झाला.

Loading...


करण जोहर निर्मित सिंबा चित्रपटात सारा अली खान दिसणार आहे. तेलगू चित्रपटाचा रिमेक असलेल्या या सिनेमात ती नायिकेच्या भूमिकेत असणार आहे.


सिंबामध्ये मराठी कलाकारांची फौजच आहे. सिद्धार्थसोबत सौरभ गोखले, विजय पाटकर, नंदू माधव यांच्याही भूमिका आहेत. रोहित शेट्टीचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मुख्य भूमिकेत आहे रणवीर सिंग. मराठी कलाकारांना बाॅलिवूडमध्ये खूप आदर मिळतो. सिद्धार्थ जाधवच्या बाबतीत हेच झालं.


23 अॉक्टोबरला सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस होता आणि तो थाटात साजरा झाला तो सुपरस्टार रणवीर सिंग आणि लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्यासोबत. सिंबा या आगामी सिनेमात सिद्धार्थ जाधव एका हटके भूमिकेत दिसणार आहे. सेटवर सिद्धार्थचा वाढदिवस आहे असं कळताच जल्लोष सुरू झाला आणि केक कटिंग करून वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू झालं.


बार बार दिन ये आये या गाण्यावर ताल धरत रणवीर सिंगने सिद्धार्थला केक भरवला.रणवीरनं डान्सही केला. या खास सेलिब्रेशनमुळे भारावून जात सिद्धार्थने दोघांचे आभार मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2018 07:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...