अभिषेकनं आपल्या यशाचं श्रेय दिलं या महिलेला; आईसमोर दिली खुलेआम कबुली

अभिषेकनं आपल्या यशाचं श्रेय दिलं या महिलेला; आईसमोर दिली खुलेआम कबुली

‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागं स्त्री चाहात असतो’अशी एक म्हण आहे. बॉलीवूड स्टार(Bollywood)अभिषेक बच्चन (Abhishek Bachhan)यालाही ही म्हण अगदी अचूक लागू पडत आहे.

  • Share this:

मुंबई 17 एप्रिल: ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागं स्त्री चाहात असतो’अशी एक म्हण आहे. बॉलीवूड स्टार(Bollywood)अभिषेक बच्चन (Abhishek Bachhan)यालाही ही म्हण अगदी अचूक लागू पडत आहे. नुकतचं त्यानं आपल्या यशाचं सगळं श्रेय ऐश्वर्याचं असल्याचं जाहीररीत्या सांगितलं आहे. अभिषेक बच्चन सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म(OTT Platform)गाजवत असून लॉकडाउननंतर (Lockdown) अनेक वेबसिरीज (Web Series), फिल्म्समध्ये (Films) त्यानं काम केलं आहे. त्याच्या कामाची चाहते, समीक्षक सगळ्यांनी प्रशंसा केली आहे. आपल्या अख्ख्या कारकिर्दीत आपण जितके व्यस्त नव्हतो तितके व्यस्त सध्याच्या काळात राहिल्याचंही त्यानं एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

अलीकडेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याचा ‘बिग बुल’(Big Bull)हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात त्यानं शेअर बाजारात मोठा घोटाळा करणारा दलाल हर्षद मेहताची भूमिका साकारली आहे. त्यालाही उदंड यश मिळाले असून, त्याच्या अभिनयाची सर्वांनी तारीफ केली आहे. या आधी ल्युडो(LUDO)या सिरीजमधील त्याच्या कामाचंही कौतुक झालं होतं. चित्रपटात फार यश न मिळालेल्या अभिषेकला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रचंड यश मिळालं आहे.

अभिषेकला मिळालेल्या या सगळ्या उदंड यशाचे श्रेय त्यानं आपली पत्नी ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai Bachchan) हिला दिलं आहे. ऐश्वर्यामुळेच आपल्याला आजचं हे यश मिळालं असून, तिनेच आपल्या आयुष्याला आकार दिला असल्याचं त्यानं म्हटलं आहे. त्यानं ऐश्वर्याचे मनापासून आभार मानले आहेत. प्रत्येकाची पत्नी ज्याप्रमाणे आपल्या पतीला उत्तम यश मिळावं, त्याच्या कामात त्याला सफलता मिळावी यासाठी प्रयत्न करते. योग्य निर्णय घ्यायला, निर्णयावर ठाम रहायला पाठबळ देते त्याप्रमाणे ऐश्वर्यानंही माझ्या आयुष्यावर लक्ष केंद्रित केलं आणि माझ्या कारकीर्दीची गाडी रुळावर आणली. फक्त रुळावरच आणली नाही तर तिला यशाच्या मार्गावर आणलं, असं अभिषेकनं म्हटलं आहे.

लॉकडाउनच्याकाळातऐश्वर्यानं त्याला आयुष्याकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. तिनं या काळातआपल्याकडे किती गोष्टी आहेत ज्याबद्दलआपणकृतज्ञअसलं पाहिजे,याची जाणीव करून दिली,असं अभिषेकनं सांगितलं.

मुलाखतीत मला नेहमी विचारलं जातं की,लॉकडाउनमध्येतुम्हीकायकेलं?काहीजणस्वयंपाककरायलाशिकले,काहीलोकांनीनवीन भाषाशिकून घेतली.मीयाबद्दलमाझ्या पत्नीशी बोलत होतो. त्या वेळीऐश्वर्यानंमला सांगितलंकी,आयुष्यात पहिल्यांदासर्वांना आपल्याकुटुंबासमवेत(Family)वेळ घालवण्याची संधी मिळालीआहे.आपलंकुटुंब सुरक्षित आहे.तेव्हा आपण आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला पाहिजे.ऐश्वर्याचं हे बोलणं मला पटलं. या काळात मला माझ्याकुटुंबासहमनसोक्तवेळ घालवण्याची संधीमलामिळाली.अनेक आवडीच्या गोष्टी करायला मिळाल्या,असं त्यानं स्पष्ट केलं आहे.

First published: April 17, 2021, 5:16 PM IST

ताज्या बातम्या