मुंबई, 24 जुलै : अनेक न्यूज पोर्टल्सने अशा बातम्या केल्या होत्या की, अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात काही बिनसलंय. ते वाचताच अभिषेक भडकला आणि त्यानंतर त्याने ट्विट करून त्याच्या भावना व्यक्त केल्या. त्याने म्हटलं की, 'या अशा खोट्या अफवा पसरवणं बंद करा. मला माहिती आहे की तुमच्यावर बातमी देण्याचा दबाव असतो. पण जी बातमी द्याल ते संपूर्ण जबाबदारीने कराल, धन्यवाद !'
पत्नी ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या यांच्याबद्दल न्यूज पोर्टल्सने बातम्या लावल्या होत्या. आणि बातम्या वाचून अभिषेक भडकला. आणि त्याने ट्विटरच्या माध्यमातून त्याने त्याचा राग व्यक्त केला. त्याचं झालं असं की, काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि ऐश्वर्या त्यांच्या मुलीसोबत सुट्टीसाठी पॅरिसला गेले होते. आणि जेव्हा ते परत येत होते तेव्हा त्यांचा एयरपोर्टवरचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये आराध्या तिच्या वडिलांचा हात सोडून आईचा हात पकडते आणि त्यानंतर ऐश्वर्या अभिषेकला काही बोलते. या दृष्यांवरून न्यूज पोर्टल्सनी त्यांच्या मध्ये काही ठीक नसल्याच्या विविध बातम्या छापण्यास सुरूवात केली. पण आता अभिषेकने यावर उत्तर देऊन सगळ्यांची तोंडं गप्प केली.
हेही वाचा
ऐश्वर्या सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या फन्ने खाँच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ३ ऑगस्ट २०१८ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आणि अभिषेकबद्दल बोलायचं झालं तर तो तापसी पन्नू आणि विकी कौशलसोबत 'मनमर्जियां'मध्ये दिसणार आहे. आणि ऐश्वर्या-अभिषेक एकत्र दिसणार आहेत ते 'गुलाब जामुन' या सिनेमात. रावण सिनेमानंतर दोघं पुन्हा एकदा एकत्र दिसतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Abhishek Bachchan