"हा एक बिझनेस आहे", बॉलिवूडमधील नेपोटिझमबाबत BIG B यांचा मुलगा अभिषेक बच्चननं सोडलं मौन

BIG B अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांचा मुलगा अभिषेक बच्चननं (abhishek bachchan) बॉलिवूडमधील नेपोटिझमबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 06 नोव्हेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर बॉलिवूडमधील (Bollywood) नेपोटिझमवरून वाद सुरू झाला. सोशल मीडियावर याची चर्चा होऊ लागली. स्टार किड्सना लक्ष्य केलं जाऊ लागलं. अनेक सेलिब्रिटींनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आपली बाजू मांडली. मात्र अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आतापर्यंत शांत होता. त्याने अखेर आपलं मौन सोडलं आहे. अभिषेकनं पहिल्यांदाच बॉलिवूडमधील नेपोटिझमबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अभिषेकनं 2000 साली रिफ्युजी फिल्ममधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने बरेच चित्रपट केले. त्यापैकी काही हिट झाले तर काही फेल. मात्र आपल्या बॉलिवूडमधील करिअरसाठी आपले वडील अमिताभ यांनी  यासाठी कुणाला फोन केला नाही किंवा कोणत्याही फिल्मला फायनान्स केलं नाही, असं अभिनषेकनं सांगितलं.

एका मुलाखतीत अभिषेक बच्चन म्हणाला, "नेपोटिझमबाबत चर्चा होते आहे. मात्र हे खरं आहे की माझ्या वडिलांना माझ्यासाठी आतापर्यंत कधीच कुणाकडे काही मागितलं नाही. वडिलांनी माझ्यासाठी फिल्म बनवल्या नाहीतर त मी त्यांच्यासाठी एक फिल्म प्रोड्युस केली, ती फिल्म म्हणजे पा आहे"

हे वाचा - पूनम पांडेला जामीन मिळताच मिलिंद सोमणविरोधात तक्रार; NUDE PHOTO मुळे अडचणीत

"हा एक व्यवसाय आहे हे लोकांनी समजायला हवं. पहिली फिल्म आल्यानंतर जर त्यामध्ये फिल्ममध्ये काम करताना तुमच्यात लोकांना काही आवडलं नाही किंवा फिल्म चांगली टिकली नाही तर तुम्हाला काम मिळणार नाही. आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी चांगलं काम करावं लागतं आणि हेच जीवनाचं कटु सत्य आहे", असं त्यानं सांगतिलं

हे वाचा - अमृता रावच्या बाळाचं नाव ठरलं! क्युट फोटो शेअर करत चाहत्यांकडे मागितलं गिफ्ट

बॉलिवूडमधील नेपोटिझमवरून अनेक स्टार किड्सना सोशल मीडियावर लक्ष करण्यात आलं. यामध्ये आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, अनन्या पांडे अशा सेलिब्रिटींचा समावेश आहे. काही स्टार किड्सनी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं. काही जणांनी तर ट्रोलर्सला कंटाळू आपलं सोशल मीडिया अकाऊंट बंद केलं. काही स्टार किड्सच्या पालकांनी त्यांची बाजू मांडली.

Published by: Priya Lad
First published: November 6, 2020, 6:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading