कधी मिळणार अभिषेक बच्चनला डिस्चार्ज? स्वत: PHOTO शेअर करून दिलं उत्तर

अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) गेले 3 आठवडे कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. अभिषेक नानावटी रुग्णालयामध्ये गेले 26 दिवस आहे

अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) गेले 3 आठवडे कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. अभिषेक नानावटी रुग्णालयामध्ये गेले 26 दिवस आहे

  • Share this:
    मुंबई, 06 ऑगस्ट : अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) गेले 3 आठवडे कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. अभिषेक नानावटी रुग्णालयामध्ये गेले 26 दिवस आहे. त्याने त्याच्या मेडिकल चार्टचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये 'Discharge Plan- NO' असं स्पष्ट लिहिण्यात आले आहे. त्यावरून अभिषेकला लवकर डिस्चार्ज मिळण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. अभिषेकने हा फोटो शेअर करताना खंबीर राहण्यासाठी स्वत:ला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने असे कॅप्शन दिले आहे की, 'हॉस्पिटलमधील दिवस- 26, डिस्चार्ज प्लॅन- नाही, कम ऑन बच्चन, तु हे करू शकतोस'. यावेळी त्याने #believe चा देखील वापर केला आहे. त्याच्या या पोस्टनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेकांनी कमेंट्स करत त्याला प्रोत्साहन दिले आहे. खंबीर राहण्यासाठी अनेकांनी त्याला प्रोत्साहन दिले आहे. बच्चन कुटुंबावर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे सावट आहे. अभिषेकबरोबर वडील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), पत्नी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि मुलगी आराध्या बच्चन देखील कोरोना पॉझिटिव्ह होते.
    वाचा-'तारक मेहता'मध्ये दयाबेनची पुन्हा एंट्री? स्पेशल एपिसोडमध्ये दिसण्याची शक्यता 11 जुलै रोजी अभिषेक आणि अमिताभ यांना नानवटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, त्यानंतर काही दिवसांनी ऐश्वर्या-आराध्याला देखील भरती करण्यात आले होते. दरम्यान 27 जुलै रोजी ऐश्वर्या-आराध्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते, तर 2 ऑगस्ट रोजी अमिताभ यांना देखील चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. वाचा-SSR Death: उद्या ईडीकडून होणार रियाची चौकशी,अभिनेत्रीच्या सीएला देखील EDचे समन्स दरम्यान या कालावधीमध्ये अभिषेक बच्चन सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्याने त्याचे आरोग्य विषयक अपडेट वेळोवेळी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचप्रमाणे अनेक चाहत्यांनी बच्चन कुटुंबीयांसाठी प्रार्थना केल्यानंतर त्यांचे आभार देखील त्याने मानले होते. तसंच सोशल मीडियावर तो हॉस्पीटल परिसरातील फोटो देखील पोस्ट करत आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published: