'मनमर्झिया'चा बोल्ड ट्रेलर पाहिलात का?

'मनमर्झिया'चा बोल्ड ट्रेलर पाहिलात का?

तुम्ही अभिषेक बच्चनचे फॅन्स असाल, तर तुमच्यासाठी एक खूशखबर. अभिषेकचा खूप दिवसांनी एक सिनेमा येतोय आणि त्याचा ट्रेलर रिलीज झाला.

  • Share this:

मुंबई, ०९ आॅगस्ट : तुम्ही अभिषेक बच्चनचे फॅन्स असाल, तर तुमच्यासाठी एक खूशखबर. अभिषेकचा खूप दिवसांनी एक सिनेमा येतोय आणि त्याचा ट्रेलर रिलीज झाला. अनुराग कश्यपचं दिग्दर्शन, तापसी पन्नू, विकी कौशलचा माईण्डब्लोईंग अभिनय. अजून काय हवं? ट्रेलर पाहूनच सिनेमा वेगळ्या धाटणीचा असल्याचा अंदाज येतोय.

हो, आम्ही 'मनमर्झिया'बद्दलच बोलतोय. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरमध्ये बिनधास्त अंदाज दिसतोय. सिनेमाच्या कथेचाही अंदाज येतोय. तापसी आणि विकी एकमेकांच्या प्रेमात आहेत. पण विकी लग्नाची जबाबदारी घ्यायची वेळ येताच मागे होतो. मग तापसी अभिषेकशी लग्न करायचं ठरवते.

ट्रेलरच्या शेवटी तर तापसी आणि अभिषेक हनिमूनला गेलेत आणि अभिषेक कंडोम विसरलाय. तापसी हे फोनवर चाचीला सांगतेय, असं दाखवलंय. त्यामुळे सिनेमा काॅमेडीकडे झुकणाराही वाटतोय.

हेही वाचा

PHOTOS : सुहाना खान करतेय इटलीत धमाल, फोटोज् व्हायरल

बाॅलिवूडचं 'तख्त' उलटवायला येतोय रणवीर सिंग!

राधिकाच्या आयुष्यात येणार मोठं वळण, मग शनायाचं काय होणार?

सिनेमात पंजाबी पार्श्वभूमी आहे. तापसी म्हणालीही होती, ' या सिनेमात प्रत्येकातला आनंद तुम्हाला दिसेल. मला तर माझे जुने पंजाबमधले दिवस आठवले.'

तापसी पन्नूनं मोजके सिनेमे केले, पण ते गाजले. मग पिंक असेल, बेबी असेल, मुल्क असेल. तापसी नेहमीच चांगला कन्टेंट देते. त्यामुळे याही सिनेमाबद्दल अपेक्षा आहेत.

अनुराग कश्यपची सेक्रेड गेम्स ही वेबसीरिज गाजतेय. या वेब सिरीजमध्ये सैफ अली खानही भूख्य भूमिकेत आहे. विक्रम चंद्राच्या पुस्तकावर ही वेब सिरीज आधारीत आहे. या सिरीजचा दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने आहे. पहिल्या सिरीजमध्ये आठ भाग रिलीज करण्यात आले आहे.

First published: August 9, 2018, 5:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading