मुंबई, 02 डिसेंबर: बच्चन कुटुंबातील सर्वात लहान आणि सर्वांची लाडकी आराध्या( aaradhya) अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची छोटी राजकुमारी आराध्याला कधी तिच्या चालण्याच्या शैलीमुळे तर कधी तिच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे ट्रोल केले जाते. आता अभिषेक बच्चनने (abhishek bachchan) पल्या मुलीची खिल्ली उडवणाऱ्या ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
आराध्याला ट्रोल करणाऱ्यांवर वडिल अभिषेक बच्चनने साधला निशाणा
बॉलीवूड लाइफशी बोलताना अभिषेक बच्चनने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. अभिषेक म्हणालाकी, हे कोणत्याही प्रकारे स्वीकारले जाऊ शकत नाही आणि हे सहन केले जाऊ शकत नाही. मी एक पब्लिक फिगर आहे, हे ठीक आहे. परंतु माझी मुलगी याचा भाग नाही. तुम्हाला काही बोलायचे असेल तर समोर या आणि माझ्या तोंडावर बोला.
वाचा :'पॅन्ट घालायला विसरली का..!' रसिका सुनील हनिमून स्पेशल फोटोवरून होतेय ट्रोल, पाहा Photo
बॉब बिस्वासमध्ये दिसणार अभिषेक बच्चान
अभिषेक बच्चनबद्दल बोलायचे तर तो लवकरच 'बॉब बिस्वास 'या क्राईम थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो कॉन्ट्रॅक्ट किलर बॉब बिस्वासची भूमिका साकारताना दिसणार आहे. या व्यक्तिरेखेत स्वत:ला सामावून घेण्यासाठी अभिषेकने आपले वजन अनेक किलोने वाढवले आहे.
View this post on Instagram
भूमिकेसाठी वाढवले वजन
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, अभिषेकने बॉब बिस्वास भूमिका साकारण्याविषयी त्याच्या मानसिक प्रक्रियेबद्दल सांगितले. तो म्हणाला की, या भूमिकेसाठी वजन वाढवण्याच्या निर्णयावर मी ठाम झालो. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माझे वजन 105 किलोपर्यंत वाढले होते. पण व्यक्तिरेखा खरी दिसावी म्हणून त्याला प्रोस्थेटिकचा सहारा न घेता वजन वाढवणे योग्य वाटल्याचे त्याने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.