Home /News /entertainment /

‘कोरोना रुग्णांसाठी तू काय केलंस?’ संतापलेल्या नेटकऱ्यांना अभिषेकनं दिलं प्रत्युत्तर

‘कोरोना रुग्णांसाठी तू काय केलंस?’ संतापलेल्या नेटकऱ्यांना अभिषेकनं दिलं प्रत्युत्तर

‘असले ट्विट करण्यापेक्षा ऑक्सिजनशिवाय मरणाऱ्या लोकांची मदत करा’; संतापलेल्या नेटकऱ्यांना अखेर अभिषेक बच्चननं दिलं संयमी उत्तर

    मुंबई 26 एप्रिल: कोरोनाच्या (coronavirus) वाढत्या संक्रमणामुळं देशवासीयांचं जीवन विस्कळीत झालं आहे. हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. कोरोनाग्रस्त ऑक्सिजनवीना मरतायेत. लसींचा तुटवडा जाणवत आहे. अशा नकारात्मक वातावरणात अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) देशवासीयांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याचं ट्विट पाहून उलट नेटकरीच त्याच्यावर संतापले. “लोकांना खोटी आश्वासनं देण्याशिवाय तुम्ही काय करताय?” असा रोखठोक सवाल त्याला विचारु लागले. अखेर या टीकाकारांना अभिषेकनं फारच संयमानं प्रत्युत्तर दिलं आहे. (Abhishek Bachchan gives epic reply to trollers) त्याचं हे उत्तर सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अभिषेकनं “मी तुम्हा सर्वांना व्हर्च्युअल हग्स पाठवत आहे. खूप प्रेम पसरवा, आपल्याला यासारख्या काळात त्याची गरज आहे. #MaskOn” अशा आशयाचं ट्विट केलं होतं. मात्र त्याचं हे ट्विट पाहून काही युझर संतापले. त्यापैकी एका महिलेनं “कदाचित तुम्ही आभासी आलिंगन पाठवण्यापेक्षा जास्त काही केलं असतं… लोक ऑक्सिजन आणि बेडशिवाय मरत आहेत. त्यासाठी हे आलिंगन पुरेसं नाही, सर.” अशी प्रतिक्रिया दिली. अवश्य पाहा - ‘कोरोनानं माझा धडधाकट मित्र खाल्ला’; अभिनेत्याच्या मृत्यूमुळं प्रवीण तरडे भावुक तिच्या या प्रतिक्रियेवर अभिषेकनं देखील संयमानं उत्तर दिलं. त्यानं “मी मॅम करतोय. मी सोशल मीडियावर पोस्ट करत नाही, याचा अर्थ असा होत नाही की, मी काहीही करत नाही. माझ्यानं जितकं शक्य असेल तितकं देण्याचा प्रयत्न करतो आहे. परिस्थिती खूप वाईट आहे, म्हणून असं वाटलं की अशा परिस्थितीत थोडंसं प्रेम आणि सकारात्मकता ही आपली मदत करू शकते.” अशा आशयाचं ट्विट करत त्यानं त्या महिलेचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. 24 तासांत 2767 मृत्यू एकीकडे देशात 1 मे पासून व्यापक स्तरावर लसीकरण केलं जाणार असताना दुसरीकडे देशातील करोना दिवसेंदिवस अधिकाधिक भीषण होऊ लागला आहे. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात 24 तासांत तब्बल 2767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे आत्तापर्यंत भारतात झालेल्या मृतांची संख्या 1 लाख 92 हजार 311 इतकी झाली आहे. त्यासोबतच 24 तासांमध्ये सलग चौथ्या दिवशी भारतात ३ लाखांहून जास्त करोनाबाधित सापडले आहेत. रविवारच्या आकडेवारीनुसार 24 तासांत 3 लाख 49 हजार 691 नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्याचवेळी देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून आजघडीला देशात करोनाचे एकूण 26 लाख 81 हजार 751 अॅक्टिव रुग्ण आहेत.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Abhishek Bachchan, Bollywood, Coronavirus, Covid-19, Entertainment

    पुढील बातम्या