मुंबई 20 मार्च: अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) गेली दोन दशकं बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. त्यानं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यापैकी काही चित्रपट हिट झाले तर काही फ्लॉप. मात्र अभिषेकला अद्याप स्वत:चा असा चाहतावर्ग प्रस्थापित करता आलेला नाही. आजही त्याला केवळ वडिल अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्याच नावावर चित्रपट मिळतात अशी टीका केली जाते. मात्र या फ्लॉप चित्रपटांच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी आता त्यानं एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्यानं आपल्या नावात एक लक्षवेधी बदल केला आहे.
अभिषेक बच्चनचा द बिग बुल हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. अन् या ट्रेलरमध्ये अभिषेकचं नाव नेहमीपेक्षा वेगळंच दिसस आहे. अभिषेकनं त्याच्या नावात आणखी एक ‘A’ जोडला आहे. त्यामुळे Abhishek Bachchanच्या ऐवजी आता Abhishek A Bachchan असं त्याचं नाव दिसत आहे. अभिषेकनं त्याच्या नावात वडिल अमिताभ बच्चन यांच्या नावाचं पहिलं अक्षर ‘A’ लिहिण्यास सुरुवात केली असं म्हटलं जात आहे.
अवश्य पाहा - ‘Corona खरंच आहे कि हे नाटक पैशांसाठी सुरू केलंय’; जुई गडकरीचा सरकारला सवाल?
येत्या 8 एप्रिलला अभिषेकचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं हा चित्रपट सिनेमागृहांऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.