मुंबई, 07 फेब्रुवारी: चार दिवस सासूचे, मधु इथे आणि चंद्र तिथे, तुझं माझं जमेना सारख्या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिजीत केळकर. बिग बॉस मराठी 2मध्येही अभिजीत सहभागी झाला होता. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, तसंच काकस्पर्श सारख्या सिनेमातही त्यानं काम केलं आहे. शिवा रंगभूमीवर ही अभिजित काम करतोय. अशातच आता अभिजीत केळकर पुन्हा एकदा मालिकेत काम करताना दिसणार आहे. यावेळी तो साधी सुधी नाही तर बालगंधर्वांची भूमिका साकारणार आहे. कलर्स मराठीवरील योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत आता सुरू होणार गोष्टी खास आहे, कारण शंकर महाराजांच्या दिव्यत्वाचा अनुभव ज्यांनी याची देही याची डोळा घेतला त्या बालगंधर्वांच्या गोष्टीला सुरुवात होत आहे. बालगंधर्वांची हि भूमिका लोकप्रिय अभिनेता अभिजीत केळकर साकारणार आहे.
बालगंधर्व हे मराठी रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक-अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या गायनाने आणि अभिनयाने मराठी नाटक जगप्रसिद्ध करणारे ते एक असामान्य कलाकार होते. मराठी माणसाच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेल्या व्यक्तींच्या यादीत बालगंधर्वांचा समावेश करावा लागेल.मराठी जनतेने बालगंधर्वांवर प्रेमाचा अक्षरशः वर्षावच केला,अश्या अद्वितीय बालगंधर्वांसोबत शंकर महाराजांची भेट कशी घडली ? तो अविस्मरणीय प्रसंग काय होता ? हे प्रेक्षकांना मालिकेद्वारे बघण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.
हेही वाचा - पब्लिक टॉयलेटमध्ये पुष्करला भेटला जबरा फॅन; अभिनेत्याच्या बाजूला उभा राहून म्हणाला...
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिजीत केळकर म्हणाला, 'जेव्हा मला याची विचारणा झाली, तेव्हा पासून खूप उत्सुकता होती. मला ही भूमिका करायचीच होती त्यामुळे मी होकार दिला. खरंतर माझा पहिले विश्वासच बसत नव्हता, मला कधी स्वप्नात देखील नाही वाटलं मला याबद्दल विचारणा होईल, कारण बालगंधर्व हा चित्रपट देखील करताना शंकर महाराज आणि त्यांचं काही नातं होतं किंवा आध्यात्मिक नातं त्यांच्यात होतं असं मला तेव्हा देखील माहिती नव्हतं'.
'सिनेमा करत असताना कधीतरी, केव्हातरी ही भूमिका साकारण्याची संधी मिळेल असं वाटत होतं. कारण जे वैभव, सर्वार्थाने जे वैभव बालगंधर्व यांनी अनुभवलं, निर्माण केलं, ज्याचा अनुभव त्यांनी प्रेक्षकांना देखील दिला असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व साकारायला मिळणं हे स्वप्नवत आहे, असं मला वाटत आणि ते या मालिकेच्या द्वारे घडलं. "A Dream come True" मला सेटवर आल्यावर ते अनुभवता येतं आहे. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, पण प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आणि उत्सुकता आहे', असं अभिजीत म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.