Home /News /entertainment /

राज ठाकरेंच्या आवाजातील दमदार टिझरनंतर 'हर हर महादेव' सिनेमाविषयी मोठी घोषणा; मराठीसह 5 भाषेत होणार प्रदर्शित

राज ठाकरेंच्या आवाजातील दमदार टिझरनंतर 'हर हर महादेव' सिनेमाविषयी मोठी घोषणा; मराठीसह 5 भाषेत होणार प्रदर्शित

राज ठाकरेंच्या आवाजातील दमदार टिझरनंतर 'हर हर महादेव' सिनेमाविषयी मोठी घोषणा; मराठीसह 5 भाषेत होणार प्रदर्शित

राज ठाकरेंच्या आवाजातील दमदार टिझरनंतर 'हर हर महादेव' सिनेमाविषयी मोठी घोषणा; मराठीसह 5 भाषेत होणार प्रदर्शित

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्या आवाजातील 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) या सिनेमाच्या टिझरनं सिनेमाची उत्सुकता वाढवली होती. आज 'शिवराज्याभिषेकदिना' दिवशी सिनेमाविषयी मोठी घोषणा करण्यात आली आहे. 'हर हर महादेव' हा सिनेमा मराठीसह पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 06 जून:  महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज शिवराज्यभिषेकादिनी (Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek Sohala) मोठी घोषणा करण्यात आली आहे. 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा महाराजांवर आधारीत सिनेमा येत्या दिवळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   अखंड उर्जेला सतत प्रवाही ठेवणारी 'हर हर महादेव' ही शिवगर्जना सिनेमाच्या माध्यमातून पाच भारतीय भाषेत ऐकायला मिळणार आहे. हा सिनेमा मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये एकाच दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. (Har Har Mahadev Marathi Film Release in Five Language)  मराठी सिनेमांच्याच्या इतिहासात आजवर कधीही न घडलेली अशी ही घटना हर हर महादेवच्या निमित्ताने घडणार आहे. शिवराज्याभिषेकाचं औचित्य साधून आज 'हर हर महादेव' हा सिनेमाविषयी ही मोठी घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे प्रेक्षकही खूश झालेत. काही दिवसांआधी सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजातील टिझरनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. सिनेमातही राज ठाकरे यांचा आवाज ऐकायला मिळणार का याची उत्सुकता आता सर्वांना आहे.  अभिजित देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाने सजलेला हा सिनेमा दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख तसेच कलाकारांची माहिती सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.  या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हॉलिवूडपटांवर काम करणारे  व्हिएफएक्स तंत्रज्ञ यावर काम करत आहेत.  तब्बल ४०० हुन अधिक तंत्रज्ञांचा यात समावेश आहे. शिवाजी महाराजांचं कार्य त्यांची थोरवी याचं आकर्षण, कुतूहल आजही अनेकांच्या चर्चेचा, अभ्यासाचा विषय असतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर भारतीय भाषिकही महाराजांच्या कार्यावर संशोधन करतात. महाराजांचा हाच महिमा भव्य दिव्य स्वरूपात 'हर हर महादेव' या सिनेमातून सर्वांसमोर येणार आहे. महाराजांचा महिमा सर्वदूर पोहचावा यासाठीच या सिनेमाची निर्मिती संस्था असलेल्या झी स्टुडिओजने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हेही वाचा - 'ऐकून छान वाटतयं..' तेजस्विनी पंडितची 'रानबाजार' बद्दल नवीन पोस्ट चर्चेत दक्षिणेकडील सिनेमाचं दैदीप्यमान यश, हिंदी भाषेत डब (भाषांतरीत) होऊन सर्वदूर पोहोचलेला दक्षिण सिनेमा आज सर्वांवर गारुड करण्यात यशस्वी झालाय. आपला मराठी सिनेमा असा भव्य दिव्य कधी बनणार ? तो इतर भाषांमध्ये कधी प्रदर्शित होणार ? याबद्दलच्या चर्चा आपण नेहमी करतो किंवा ऐकतो. या प्रश्नांना आणि चर्चांना आता एक सकारात्मक उत्तर 'हर हर महादेव' सिनेमाच्या माध्यमातून मिळणार आहे.  याबद्दल बोलताना झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हटलं आहे की, "छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यच इतकं महान आणि भव्य आहे की ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहू शकत नाही. महाराजांची युद्धनीती ,संघटन कौशल्य जगभरात अभ्यासलं जातं . आज इतर भाषांमधील काल्पनिक गोष्टी आपल्याला मोहवून टाकत आहेत  त्यामुळे  आपला खरा, प्रेरणादायी आणि देदीप्यमान असा इतिहास तेवढ्याच भव्यतेने जगासमोर आलाच पाहिजे ही भावना आमच्या मनात होती. या भावनेतूनच आम्ही हर हर महादेव सर्व भारतात पाच भाषांमध्ये प्रदर्शित करायचं ठरवलं आहे.
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Zee Marathi

    पुढील बातम्या