मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi: 'भविष्यात मी बिग बॉसचा अँकर असेन'; अभिजीत बिचुकलेचं मांजरेकरांना चॅलेंज

Bigg Boss Marathi: 'भविष्यात मी बिग बॉसचा अँकर असेन'; अभिजीत बिचुकलेचं मांजरेकरांना चॅलेंज

अभिजीत बिचुकले

अभिजीत बिचुकले

बिग बॉस मराठी 2 मधील वादग्रस्त्र अभिजीत बिचुकलेंनी पुन्हा एकदा बिग बॉसच्या सूत्रसंचालकाशी पंगा घेतला आहे. थेट मांजरेकरांना बिचुकलेनं चॅलेंज दिलंय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  29 सप्टेंबर : टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त शो म्हणून ज्याकडे पाहिलं जात असा शो म्हणजे बिग बॉस. मागच्या 3 वर्षांपासून बिग बॉस मराठीमध्ये देखील सुरू झालं आहे. अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर बिग बॉस मराठीच्या सूत्रसंचालकाची भूमिका उत्तमपणे पार पाडत आहे. आता बिग बॉस मराठीचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दरम्यान मागच्या तीन सीझनमध्ये अनेक कॉन्ट्रोवर्सी झाल्या. अनेक कलाकार घरात आले. त्यातील काही स्पर्धक आजही प्रेक्षकांच्या डोक्यात फिट आहेत. त्यातील एक नाव म्हणजे अभिजीत बिचुकले. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन येत असताना बिचुकलेंनी 'भविष्यात मी बिग बॉसचा अँकर असेन', असं चॅलेंज महेश मांजरेकर यांना दिलं आहे.

नुकताच बिग बॉस मराठी 4चा लाँचिंग इव्हेंट झाला. यावेळी महेश मांजरेकरांनी ग्रँड एंट्री झाली. दरम्यान बिग बॉसच्या घरात पहिल्या तीन सीझनमधील कोणत्या स्पर्धकांना पुन्हा पाहायला आवडेल आणि कोणाला नाही असा प्रश्न विचारला असता मांजरेकरांनी अभिजीत बिचुकलेंना पाहायला आवडणार नाही असं सांगितलं. ते म्हणाले,'बिचुकले गेममध्ये भाग घेत नव्हता. त्याच्यात तो usp आहे पण तो किती वेळ पाहणार. घरात ऑलराऊंडर प्लेअर पाहिजेच. तिथे असलेल्या प्रत्येकाचा एक usp आहे.'

हेही वाचा - Bigg Boss Marathi : बिचुकलेची अटक ते सोनालीवर विशालचे गंभीर आरोप; 'हे' आहेत बिग बॉसमधील बहुचर्चित वाद

बिचुकले यांच्याबद्दल महेश मांजरेकरांनी केलेल्या या वक्तव्यावर उत्तर देत बिचुकलेंनी भविष्यात मी बिग बॉस मराठीचा अँकर असेन असं चॅलेंज दिलं. बिचुकले म्हणाले, 'महेश मांजरेकर पैसे घेऊन तिथे नोकरी करतात. त्यामुळे त्यांच्या विधानाला किती महत्त्व द्यायचं. एंडोमोल कंपनीनं मला मोठं केलं. सेकंड सीझन माझा कोणामुळे गाजला? मी किती टीआरपी दिला? याची  एंडोमोल कंपनीला जाण असेल तर महेश मांजरेकरांच्या कोणत्याही वक्तव्याला ते महत्त्व देणार नाही.  भविष्यात मी बिग बॉसचा अँकर होईन असा मला विश्वास आहे'.

केवळ मराठीच नाही तर त्यानंतर हिंदी बिग बॉसमध्येही अभिजीत बिचुकलेंनी चांगलाच हंगामा केला होता. थेट सलमान खानची पंगा घेतला होता. 'असे अनेक सलमान खान मी घर झाडायला घेतो', असं म्हणत सलमान खानला चॅलेंज दिलं होतं.

First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news