Home /News /entertainment /

नवरा मेहुलसाठी अभिज्ञा भावेची खास पोस्ट, बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत म्हणाली....

नवरा मेहुलसाठी अभिज्ञा भावेची खास पोस्ट, बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत म्हणाली....

आज मेहुलचा वाढदिवस आहे. आपल्या नवऱ्याची नेहमी साथ देणाऱ्या अभिज्ञाने खास अंदाजात मेहुलचा (mehul pai birthday ) वाढदिवस साजरा केला आहे.

    मुंबई, 18 मे - मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे (abhidnya bhave) सध्या मनोरंजन सृष्टीतील एक ओळखीचा चेहेरा बनली आहे. अनेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारूनसुद्धा प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिलं आहे. पडद्यावर व्हिलन असणारी अभिज्ञा रिअल लाईफमध्ये मात्र एक सुपरवुमन आहे. कारण आपला पती कॅन्सरशी झुंज देत असताना (mehul pai suffering cancer) ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी आहे. आज मेहुलचा वाढदिवस आहे. आपल्या नवऱ्याची नेहमी साथ देणाऱ्या अभिज्ञाने खास अंदाजात मेहुलचा (mehul pai birthday ) वाढदिवस साजरा केला आहे. सोशल मीडियावर तिनं काही फोटो देखील शेअर केले आहेत. अभिज्ञा भावे जितकी उत्कृष्ट अभिनेत्री आहे तितकीच उत्तम पत्नीसुद्धा आहे. आपल्या नवऱ्याच्या कठीण काळात ती तिच्यासोबत उभी आहे. अभिज्ञा सतत पती मेहुलला आत्मविश्वास आणि धीर देताना दिसते. यामुळेच मेहुल लवकर रिकव्हर होत आहे. मेहुलच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो अभिज्ञानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. माझ्या सर्वात आवडता व्यक्ती....आज तुझा बर्थडे! अभिज्ञानं तिच्या इन्स्टाग्रावर लिहिलं आहे. मेहुलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा-PHOTO:'पावनखिंड' फेम अक्षय वाघमारेने धूमधडाक्यात साजरा केला लेकीचा पहिला वाढदिवस अभिज्ञा भावे आणि मेहुलची लव्हस्टोरी अभिज्ञा भावे आणि मेहुलची लव्हस्टोरी फिल्मी आहे. अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. 15 वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखायचे. मात्र कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता. काही दिवसांनी हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यातली मैत्री पुन्हा फुलत गेली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. अभिज्ञाप्रमाणे मेहुलचा देखील घटस्फोट झाला असल्यानं दोघांनीही त्यांच्या नात्याला लग्नात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 6 जानेवारी 2021 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे या दोघांच्या लुकनी सर्वांचे लक्ष वेधले होते. अभिज्ञाचा पती मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या 12 वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

    पुढील बातम्या