Home /News /entertainment /

लगीन घटिका समीप आली... 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्रीच्या हातावर रंगली मेहंदी; पाहा VIDEO

लगीन घटिका समीप आली... 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्रीच्या हातावर रंगली मेहंदी; पाहा VIDEO

कोरोनाचे सर्व नियम पाळून, जवळच्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत तिचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

  मुंबई, 04 जानेवारी : 2020 मध्ये अनेक सेलिब्रिटींची लग्न झाली. आता 2021 मध्येही अनेक मराठी सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. यात सर्वात पहिला नंबर लावला आहे तो लगोरी फेम अभिज्ञा भावेनी (Abhidnya Bhave). अभिज्ञा भावेच्या मेहंदी सेरिमनीचे (Abhidnya Bhave Mehndi Ceremony) व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत. अभिज्ञा लवकरच मेहूल पैसोबत (Mehul Pai) लग्नबंधनात अडकणार आहे. अभिज्ञाने अद्याप स्वत: तिच्या मेहंदीचा व्हिडीओ शेअर केला नसला तरी तिचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांपर्यंत पोहोचला आहे. या व्हिडीओमध्ये अभिज्ञाने फुलांचे दागिने घातलेले दिसत आहेत. या वेशात ती अतिशय क्यूट दिसत आहे. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
  अभिज्ञा भावेचा  होणारा नवरा मेहूल पै मुंबईत राहतो. ऑक्टोबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. तिच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले होते. सध्या ती रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहवरील मालिकेत दिसून येत आहे. त्या आधी तिने खुलता कळी खुलेना, लगोरी, प्यार की एक कहानी अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिज्ञा अभिनय क्षेत्रात येण्याआधी एअर हॉस्टेस होती.
  या वर्षात मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक असे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या