मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'वाईट काळ नवरा बायकोसाठी परीक्षेची वेळ', नवऱ्यासाठी अभिज्ञा कशी राहिली खंबीरपणे उभी?

'वाईट काळ नवरा बायकोसाठी परीक्षेची वेळ', नवऱ्यासाठी अभिज्ञा कशी राहिली खंबीरपणे उभी?

अभिज्ञा भावे (Abhdnya Bhave) अर्थात आपली लाडकी पुष्पवल्ली सध्या नव्या भूमिकेत जरी छान अभिनय करत असली तरी तिच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वी एक कठीण काळ आला होता. याकडे अभिज्ञा आता कसं बघते? याबद्दल तिच काय म्हणणं आहे जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 13 जून: अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) एक गुणी अभिनेत्री आहे. अभिज्ञा मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षांसमोर येत गेली आणि आज ती एका वेगळ्या स्थानावर आहे. प्रेक्षकांना तिचा अंदाज सुद्धा प्रचंड आवडतो. तिच्या प्रत्येक भूमिकेचं आजवर खूप कौतुक झालं आहे. पण अभिज्ञाच्या आयुष्यात एक वाईट काळ मागच्या काही महिन्यांपूर्वी आला होता जेव्हा तिच्या पतीला (Abhidya Bhave Husband) कॅन्सरचं निदान झालं. अशा काळात अभिज्ञाने आपल्या पतीला नक्की कशी साथ दिली?

अभिज्ञाने मागच्या वर्षी मेहुल पैसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला बरीच मित्रमंडळी आणि मराठीतील अनेक कलाकार सुद्धा हजर होते. तिच्या वेडिंग लुक, आणि एकूणच लग्नाची सुद्धा खूप चर्चा झाली होती. मात्र लग्नाच्या काही दिवसांमध्येच तिने एका पोस्टमधून तिच्या नवऱ्याला कॅन्सरचं निदान झाल्याची बातमी शेअर केली. या बातमीनंतर तिला अनेकांनी खूप आधार दिला. तिच्या चाहत्यांनी सुद्धा तिला ‘आम्ही तुझ्यासोबत आहोत’ असा खंबीर आधार दिला होता.

या गोष्टीला आता काही काळ लोटला आहे. याबद्दल अभिज्ञाने बऱ्याच प्रसार माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं होतं. ‘मराठी वल्ड एन्टरटेन्टमेंट’ ला दिलेल्या मुलाखतीत अभिज्ञानं आपल्या या कठीण काळाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. या गोष्टीमुळे तिला बराच धक्का बसला होता आणि ती काही काळासाठी कोशात गेली होती. मात्र आता मेहुल ची तब्येत आधीपेक्षा खूप सुधारली आहे. त्याची प्रकृती उत्तम आहे आणि तो रिकव्हरी मोड मध्ये आहे असं अभिज्ञाने स्पष्ट केलं. पण ती असं सुद्धा म्हणाली की धोका अजून पूर्णपणे टळला नाहीये. त्याच्या फॉलोअप ट्रीटमेंट चालू आहेत. एखादा कठीण काळ जोडप्यांच्या आयुष्यात कसा परिणाम करतो यावर ती म्हटली, “मी आणि मेहुलने या गोष्टीकडे खूप सकारत्मकतेने पाहायचं ठरवलं. मला असं वाटत की कदाचित चांगला काळ नाही तर वाईट काळ एका जोडप्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. ही वेळ एका परीक्षेसारखी असते. त्यावेळी एकतर तुम्ही खूप जवळ येता, तुमचं नातं अधिक घट्ट होतं किंवा तुम्ही पूर्णपणे लांब होऊन तुमचं नातं तुटत.

" isDesktop="true" id="716686" >

मला सांगायला आनंद होतो की मी आणि मेहुल या कठीण काळामुळे खूप जवळ आलो. आमचं नातं अधिक स्ट्रॉंग झालं आहे. अशा काळात इमोशनली माणूस खूप नाजूक अवस्थेत असतो तेव्हा फक्त त्याला सपोर्ट करणं महत्त्वाचं आहे.

हे ही वाचा- सलमानप्रमाणे शाहरूखला देखील मिळाली होती धमकी, तेव्हा किंग खाननं लढवली होती अनोखी युक्ती!

 माझ्याकडून मी काय करू शकत होते तर फक्त आहे तो दिवस उत्तम पद्धतीने जगून त्याच्यासोबत आनंदाने राहू शकत होते. अशा काळात तेच करणं अधिक गरजेचं असतं ”

अभिज्ञाच्या सांगण्यानुसार मेहुलसुद्धा कामावर परतला असून तो स्वतःची पूर्ण काळजी घेत आहे, पथ्य पाळत आहे. या काळात तिच्या घरच्यांनी केलेला सपोर्ट अमूल्य होता हे ती सांगायला विसरली नाही.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment