Home /News /entertainment /

Abhidnya Bhave: अभिज्ञाचा बर्थ डे नसतानाही मालिकेची टीम करतेय FAKE सेलिब्रेशन; काय आहे ही भानगड?

Abhidnya Bhave: अभिज्ञाचा बर्थ डे नसतानाही मालिकेची टीम करतेय FAKE सेलिब्रेशन; काय आहे ही भानगड?

स्वतःचा वाढदिवस नसताना सुद्धा होणारं हे सेलिब्रेशन बघून अभिज्ञा सुद्धा बरीच चक्रावलेली दिसत आहे.

  मुंबई 02 ऑगस्ट: झी मराठीवरील तू तेव्हा तशी मालिका सध्या बरीच लोकप्रिय होताना दिसत आहे. मालिकेतील एकाहून एक पात्र सगळ्या प्रेक्षकांना आवडत आहेत पण विशेष करून लक्षात राहते ती म्हणजे पुष्पवल्ली अर्थात वल्ली वहिनी. नावातच वल्ली असलेली पुष्पावल्ली अभिज्ञा भावे ही अभिनेत्री साकारत आहे. सध्या मात्र अभिज्ञाचा खोटा वाढदिवस मालिकेच्या सेटवर साजरा होत असल्याचं एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि त्यावर स्वतः अभिज्ञाही चक्रावल्याचं दिसत आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे? झी मराठीच्या सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये अभिज्ञाचे डोळे झाकत टीम तिला एक सरप्राईज देताना दिसत आहे. तिच्यासाठी खास केक आणला असून त्यावर ‘हॅपी बर्थ डे नागीण’ असं लिहिलं आहे. आणि (abhidnya bhave as pushpavalli) अभिज्ञाला सरप्राईज देत कलाकार तिच्यासाठी बर्थडेचं गाणं गाताना दिसत आहेत. हे सगळं नागपंचमीच्या निमित्ताने केल्याचं समोर येत आहे. मालिकेत वल्ली स्वतःची ओळख नाजूक वेल नाही तर डसणारी नागीण आहे अशीच करून देत आली आहे. त्यामुळे सगळ्या टीमने मिळून आज नागपंचमीचा दिवस साधत तिचं कौतुक करत सेलिब्रेशन करायचा बेत आखल्याचं समोर येत आहे. या सेलिब्रेशनमध्ये अभिज्ञा सुद्धा भाग घेऊन त्या क्षणाची मजा घेताना दिसत आहे. आजच्या दिवशी अभिज्ञाला सुद्धा चाहत्यांकडून बऱ्याच शुभेच्छा आल्या आहेत. वल्लीच्या नावाने मिम्स सुद्धा फिरत असल्याचं दिसून आलं आहे. अभिज्ञा सुद्धा या सगळ्यावर आनंदाने हसताना दिसत आहे.
  तू तेव्हा तशी मालिका सध्या चांगल्या ट्रॅकवर सुरु आहे. मालिकेत नुकतच एक नवं गाणं सुद्धा येऊन गेलं ज्यामध्ये जाऊबाई आणि वहिनींमधला एक खट्याळ संवाद समोर आला होता. मालिकेच्या एक तासाच्या विशेष भागात अनामिका आणि सौरभ सहकुटुंब गाण्यावर थिरकताना दिसले होते. हे ही वाचा- Tu Tevha Tashi: पटवर्धनांच्या वाड्यात अनामिकाची एंट्री; पुष्पवल्लीच्या होणाऱ्या जाऊबाईंचा खास उखाणा ऐका येत्या काळात अनामिका आणि सौरभ हे वाड्यात एकत्र राहताना दिसणार आहेत. या निमित्ताने अनामिका पटवर्धनांच्या घरात पाऊल टाकण्याआधी झकास उखाणा घेताना सुद्धा दिसून आली आहे. लग्नाआधी अनामिका आणि सौरभ हे एकमेकांना समजून घेण्यासाठी एकत्र राहताना दिसणार आहेत.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Birthday celebration, Marathi actress, Zee Marathi

  पुढील बातम्या