आता तिनं इन्स्टाग्रामवर वडिलांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा (Birthday Celebration) व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अभिज्ञा तिच्या घरच्यांसोबत वाढदिवसाची तयारी करताना दिसते आहे. फुगे फुगवून घराची सजावट केल्याचं यात दिसतं आहे. वाढदिवस असल्यानं केक तर होताच. केकवर साठ आकडा होता. अभिज्ञा भावेसह घरातील इतर मंडळी त्यांना शुभेच्छा देत असल्याचं यात दिसतंय. घरच्यांसोबतची धमाल कोणाला आवडत नाही? अभिज्ञानंही वडिलांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून घरच्यांसोबत एक दिवस एंजॉय केला. एकत्र केक कापणं, फोटोसेशन इतकंच नाही चमचा-लिंबू सारखे खेळही ते सगळे खेळले. अभिज्ञानं ही सगळी धमाल तिच्या इन्स्टा रीलमध्ये कॅप्चर केली आहे. अभिनेत्री श्रेया बुगडे, अनुजा साठे यांनीही या रीलवर प्रतिक्रिया देत अभिज्ञाच्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिज्ञा भावे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) या मालिकेत दिसते आहे. पुष्पवल्ली नावाचं तिचं कॅरेक्टर खूप लोकप्रिय झालं आहे. पुष्पवल्ली या निगेटिव्ह कॅरेक्टरला चाहत्यांनी उत्तम दाद दिली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं सेटवरचा दिवस कसा असतो, याबद्दलही एक इन्स्टा रील केलं होतं. त्याआधी पुष्पवल्लीच्या लूकबाबतही तिनं पोस्ट केली होती. आता वडिलांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या निमित्तानं अभिज्ञा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Birthday celebration, Marathi actress, Marathi entertainment