विक्रांतची 'मायरा' आता बनणार समंजस गृहिणी

एरवी काॅर्पोरेट लूकमध्ये दिसणारी अभिज्ञा भावे आता गृहिणीच्या वेषात दिसणार आहे.

  • Share this:

'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेतील मायराची भूमिका साकारणारी अभिज्ञा सध्या साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतेय. भूमिका कुठलीही असो आपल्या खास अशा टचने ती प्रत्येक भूमिका आपलीशी करते.

'सूर सपाटा' या आगामी मराठी चित्रपटात तिचीही महत्त्वपूर्ण भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'सूर सपाटा'मध्ये अभिज्ञा एका ध्येयवेड्या कबड्डीपट्टू मुलाच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

चिन्मय पटवर्धनच्या म्हणजेच 'सूर सपाटा'मधील 'पुरण'च्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेतील अभिज्ञा कधी प्रेमळ... प्रसंगी कठोर... तर कधी भावाच्या पंखांना बळ देणाऱ्या खंबीर भूमिकेत विशेष कष्ट घेताना दिसतेय.

'सूर सपाटा'मध्ये अभिज्ञासोबत उपेंद्र लिमये, संजय जाधव यांच्याही भूमिका आहेत.

मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा' २२ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अभिज्ञाचा हा मेकओव्हर प्रेक्षकांना कसा वाटतोय, हे कळेलंच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 12:56 PM IST

ताज्या बातम्या