'मैं भी डायरेक्‍टर के साथ सोया हूं', अभय देओलच्या धक्कादायक पोस्टनं चाहते हैरण

'मैं भी डायरेक्‍टर के साथ सोया हूं', अभय देओलच्या धक्कादायक पोस्टनं चाहते हैरण

विनोदी स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभय देओलनं अशाप्रकारची धक्कादायक पोस्ट केल्यानं त्याचे चाहते हैराण झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : बॉलिवूड काही चांगल्या पटकथांच्या सिनेमात काम करणारा अभिनेता अभय देओल त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचा अभिनयाचे अनेक चाहते आहेत. पण याव्यतिरिक्त तो त्याच्या विनोदी स्वभावासाठीही ओळखला जातो. असं अनेकदा झालं आहे की त्यानं सोशल मीडियावर मीम्स किंवा जोक शेअर केले आहेत. पण यावेळी मात्र त्यानं एक विचित्र पोस्ट केली आहे. ज्यात त्यानं आपण त्याच्या दिग्दर्शकासोबत झोपल्याचा खुलासा केला आहे.

अभय देओल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नुकताच अभयनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यातून त्यानं तो त्याच्या दिग्दर्शकासोबत झोपल्याचं स्पष्ट केलं आहे. पण अभयच्या या पोस्टमुळे नेटकरी आणि चाहते मात्र हैराण झाले आहेत.

गर्लफ्रेंडसाठी अर्जुन रामपालनं पत्नीला दिला घटस्फोट, 21 वर्षांचा संसार मोडला

वेब सीरिजचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबत अभयनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, शेवटी मी हे केलं. मी माझ्या दिग्दर्शकासोबत झोपलो होतो. महेश मांजरेकर यांच्यासोबत सेटवर मी हॉटस्टार आहे. या फोटोमध्ये महेश मांजरेकर एका खुर्चीवर झोपलेले असून अभय देओल त्यांच्या बाजूच्या दुसऱ्या खुर्चीवर झोपलेला दिसत आहे.

Loading...

 

View this post on Instagram

 

I finally did it. I slept with my director. On set with Mahesh Manjrekar. I’m a @hotstar.

A post shared by Abhay Deol (@abhaydeol) on

अभय देओल सध्या हॉटस्टारच्या एका वेब सीरिजचं शूट करत आहे. 1962च्या भारत-चीन युद्धावर आधारित असलेल्या या वेब सीरिजचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत. हा वेबसीरिज हॉटस्टारची सर्वात महागडी वेब सीरिज असल्याचं बोललं जात आहे.

सलमानच्या वडीलांशी लग्न करुनही हेलन कधीही होऊ शकल्या नाही ‘आई’

आराध्याच्या बर्थडे पार्टीचे PHOTO VIRAL, 'या' कारणानं ट्रोल झाली ऐश्वर्या

=======================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 04:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...