अभयचा फेअरनेस क्रिमविरुद्ध लढा ; शाहरुख, दीपिकावर टीका

अभयचा फेअरनेस क्रिमविरुद्ध लढा ; शाहरुख, दीपिकावर टीका

"रंग गोरा किंवा एखादीचा काळा अशी तुलनाच होणं चुकीचं आहे"

  • Share this:

13 एप्रिल : अभिनेता अभय देओलने त्याच्या फेसबुकवरुन पोस्टद्वारे फेअरनेस क्रिमच्या जाहिरातांविरोधात आपल्याच सहकलाकारांवर निशाणा साधलाय. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एक जोरदार चर्चेने जोर धरलाय.

रंग गोरा किंवा एखादीचा काळा अशी तुलनाच होणं चुकीचं आहे असं म्हणत त्याने  फेअरनेस क्रिमची जाहिरात करणाऱ्यांविरोधात मोहीम उघडलीये. अभयने आपल्या फेसबुक पेजवर शाहरूख खान, जाॅन अब्राहम, सोनम कपूर, विद्या बालन, सिद्धार्थ मल्होत्रा, शाहीद कपूर यांनी केलेल्या जाहिराती पोस्ट केल्यात.

मध्यंतरी कंगना राणावतने फअरनेस क्रिमची अॅड नाकारली आणि ही मानसिकता किती चुकीची आहे हा मुद्दा मांडला होता. तसंच अभयने त्याच्या या मार्मिक पोस्टमधून फेअरनेस क्रिम विकणाऱ्यांना आणि ते प्रमोट करणाऱ्यांवर टीका केलीये. तो म्हणतो की, मुळात एखाद्या स्त्रीचा त्याने त्याच्या सहकलाकारांना या फेअरनेस क्रिमची जाहिरात करण्यापासून परावृत्तही केलंय...यानंतर यावर काय प्रतिक्रिया उमटतात त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 12:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...