मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

दोन्ही मुलांची मुस्लीम नावं का ठेवली? सलमानचा जीजाजी आयुषनं केला खुलासा

दोन्ही मुलांची मुस्लीम नावं का ठेवली? सलमानचा जीजाजी आयुषनं केला खुलासा

पहिल्यांदाच आयुष शर्मानं स्वतः हिंदू असतानाही आपल्या दोन्ही मुलांची नावं मुस्लीम धर्मानुसार का ठेवली याचा खुलासा केला.

पहिल्यांदाच आयुष शर्मानं स्वतः हिंदू असतानाही आपल्या दोन्ही मुलांची नावं मुस्लीम धर्मानुसार का ठेवली याचा खुलासा केला.

पहिल्यांदाच आयुष शर्मानं स्वतः हिंदू असतानाही आपल्या दोन्ही मुलांची नावं मुस्लीम धर्मानुसार का ठेवली याचा खुलासा केला.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 21 एप्रिल : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि त्याची बहीण अर्पिताचा नवरा आयुष शर्मा एकामेकांचे चांगले मित्र आहे. दोघंही सध्या लॉकडाऊनमुळे सलमानच्या पनवेल मधील फार्म हाऊसवर अडकले असून ते सोशल मीडियावर बरेच सक्रिय असलेले पाहायला मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वीच आयुष आणि अर्पिता दुसऱ्यांना आई-बाबा झाले. सलमानच्या वाढदिवसालाच अर्पितानं सी-सेक्शनच्या मदतीनं मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता पहिल्यांदाच आयुष शर्मानं स्वतः हिंदू असतानाही आपल्या दोन्ही मुलांची नावं मुस्लीम धर्मानुसार का ठेवली याचा खुलासा केला.

बॉलिवूड अभिनेता आयुष शर्मा आणि अर्पिता खान यांना दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. आयुषच्या मुलाचं नाव अहिल तर मुलीचं नाव आयत आहे. आयुषनं काही दिवसांपूर्वीच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत स्वतः हिंदू असतानाही मुलांची नावं मुस्लीम धर्मानुसार का ठेवली याचा खुलासा केला.

डब्बेवाले, उद्योजक आणि कलाकारांचं कोरोनावर नवं गाणं, पाहा VIDEO

या मुलाखतीत आयुष शर्मा म्हणाला, माझी पत्नी अर्पिता एका मुस्लीम कुटुंबातली आहे. तर मी एका हिंदू कुटुंबातला आहे. असं असलं तरीही मी आणि अर्पिता धर्मनिरपेक्ष नात्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे आणि आम्ही दोघांनीही ठरवलं होतं की मुलांचं नावं मुस्लीम तर त्यांचं आडनाव हिंदू असेल.

नोरा फतेहीनं केली Tik Tok वर एंट्री, पहिल्याच डान्स Video ची इंटरनेटवर धम्माल

आयुष पुढे म्हणाला, आम्ही ठरवलं होतं की, मुलांची नावं ही आम्ही A वरुन ठेवणार आहोत. कारण माझं नाव ए वरुन सुरू होतं आणि अर्पिताचं नाव सुद्धा ए वरुन सुरू होतं. जेव्हा मी एकदा लंडनला गेलो होतो त्यावेळी मी एका व्यक्तीला भेटलो होतो. त्याचं नाव अहिल होतं. त्याचं नाव मला खूप वेगळं वाटलं. त्यानंतर मी भारतात परतल्यावर त्याचा अर्थ शोधला जो पारसीमध्ये राजकुमार असा होता.

मुलगी आयतबद्दल बोलताना आयुष म्हणाला, अहिलला आता एक लहान बहीण मिळाली आहे. नुकतंच तिनं प्रतिक्रिया देणं सुरू केलं आहे. लॉकडाऊनमुळे मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मी सध्या वडील म्हणून माझी कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष आणि अर्पितानं 18 नोव्हेंबर 2014 ला लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला आता 6 वर्षं झाली आहेत.

Lockdown मध्ये कार्तिक आर्यनला रोज खावा लागतोय बहिणीचा मार, शेअर केला Video

First published:

Tags: Bollywood, Salman khan