मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Star Pravahवर रंगणार धम्माल म्युझिकल शो; 'ही' मालिका होणार बंद

Star Pravahवर रंगणार धम्माल म्युझिकल शो; 'ही' मालिका होणार बंद

स्टार प्रवाह ही वाहिनी प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. लवकरच स्टार प्रवाहवर नवा कार्यक्रम येणार आहे. त्याचप्रमाणे एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

स्टार प्रवाह ही वाहिनी प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. लवकरच स्टार प्रवाहवर नवा कार्यक्रम येणार आहे. त्याचप्रमाणे एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

स्टार प्रवाह ही वाहिनी प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. लवकरच स्टार प्रवाहवर नवा कार्यक्रम येणार आहे. त्याचप्रमाणे एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 19 ऑगस्ट : टेलिव्हिजन विश्वात सध्या स्टार प्रवाह ही वाहिनी प्रेक्षकांची लाडकी वाहिनी ठरली आहे. स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या असून टीआरपीच्या शर्यतीत दरआठवड्यात स्टार प्रवाहचं आघाडी घेताना दिसत आहे. स्टार प्रवाहवर अनेक विषयांच्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. 'रंग माझा वेगळा' आणि 'आई कुठे काय करते' या मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. तर दुसरीकडे 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका देखील दोन मालिकांना टक्कर देताना दिसतेय.   इतकचं नाही स्टार प्रवाहवर वेगवेगळे रिअँलिटी शो देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आणखी नवीन शो देखील स्टार प्रवाहवर सुरू होणार आहेत. स्टार प्रवाहवर नवा रिअँलिटी शो सुरू होणार आहे.त्यामुळे कोणत्या तरी एका शो ला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे.  'आता होऊदे धिंगाणा' हा नवा रिअँलिटी शो स्टार प्रवाहवर येत्या 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.  'जेव्हा जेव्हा गाणं वाजणार तेव्हा तेव्हा धिंगाणा होणार', अशी टॅग लाईन घेऊन हा नवा कोरा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दर आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता हा शो पाहता येणार आहे. स्टार प्रवाहवरील मालिकेतील कलाकार आणि इतर पाहुण्यांमध्ये हा  धम्माल म्युझिकल गेम शो रंगणार आहे. शोचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही उत्सुकता दाखवली आहे. हेही वाचा - Tujhech Mi Geet Gaat Ahe : जय श्री कृष्णा! सेटवरील छोटे गोपाळ; पिहू आणि स्वराजनं फोडली हंडी
View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आता होऊदे धिंगाणा हा शो सुरू होणार असल्यानं 'मी होणार सुपरस्टार' हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या 21 ऑगस्टला पाहायला मिळणार आहे. मी होणार सुपरस्टारचा हा दुसरा सीझन होता. पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. नव्या कार्यक्रमाच्या प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं आणि लग्नाची बेडी मालिकेतील कलाकार एकत्र आल्याचं दिसतंय. सासू सुनेचा दंगा आणि नवरा बायकोचा वेगळाच पंगा प्रोमोमध्ये पाहायला मिळतोय.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या