बॉबी देओलचा Aashram संकटात; 'त्या' दृश्यांविरोधातील याचिकेवर 11 जानेवारीला सुनावणी

बॉबी देओलचा Aashram संकटात; 'त्या' दृश्यांविरोधातील याचिकेवर 11 जानेवारीला सुनावणी

आश्रम (Ashram) या वेब सीरिज वादात अडकली आहे. बॉबी देओल (Bobby Deol) आणि निर्माते प्रकाश झा (Prakash Jha) यांना जोधपूर कोर्टाने नोटीस पाठवली आहे.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल स्टारर (Bobby Deol) वेब सीरिज आश्रमचा (Aashram) दुसरा सीझन वादात अडकला आहे. 'आश्रम' या प्रसिद्ध वेब सीरिजमुळे कोर्टाने निर्मात्यांना नोटीस दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 11 जानेवारी रोजी होणार आहे. अशा प्रकारे, दोघांना 11 जानेवारीपर्यंत कोर्टाच्या नोटीसला उत्तर द्यावे लागेल. 'आश्रम' ही वेब सीरिज एमएक्स प्लेयरवर रिलीज झाली होती. यात आश्रमातील महिलांचा होणारा छळ दाखवला गेला आहे.

'आश्रम' वेब सीरिजचा पहिला सिझन प्रदर्शित झाला तेव्हाच त्यातल्या निर्माते आणि कलाकारांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला होता. आता वेब सीरिजचा दुसऱ्या सिझनवरही असाच आरोप होत आहे. वेब सीरिजचा मुख्य कलाकार बॉबी देओल आणि निर्माते प्रकाश झा यांनी असे आरोप सरसकट फेटाळले.

बॉबी देओल यांनी फेसबुकवर न्यूज 18 शी बोलताना म्हटलं होतं की, 'या वेब सीरिजमध्ये धर्माच्या नावाखाली फसवणूक करणा बाबांविरूद्ध भूमिका मांडली गेली आहे. कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. पण समाजात जे घडत आहे ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला असंही त्यांने म्हटलं होतं.'

एमएक्स प्लेअरवरील 'आश्रम' ही सीरिज आहे. बॉबी देओल यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. त्याने 'काशीपूरवाले बाबा निराला' ही भूमिका साकारली आहे. आता 11 जानेवारी रोजी कोर्टात काय सुनावणी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान आश्रम वेब सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर दुसऱ्या सिझनलाही संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 14, 2020, 5:15 PM IST

ताज्या बातम्या