मुंबई, 26ऑक्टोबर- बॉबी देओल(Boby Deol) स्टारर वेब सीरिज 'आश्रम'(Aashram) च्या तिसऱ्या सीझनच्या सेटची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप आहे. यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यावर टीका केली होती. त्याचवेळी प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियानेही या हिंसक वागणुकीवर टीका करत निवेदन जारी केलं आहे. निवेदनात म्हटलं आहे की, "प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया भोपाळमध्ये झालेल्या 'आश्रम' या वेब सीरिजच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या क्रूवर झालेल्या हिंसाचार, छळ आणि तोडफोड या कृत्यांचा तीव्र निषेध करतो'. दुर्दैवाने, ही एक नवीन घटना नाही आणि गिल्ड अशा घटनांबद्दल चिंतित आहे ज्यामुळे प्रोडक्शन आणि प्रदर्शन क्षेत्र गंभीरपणे विस्कळीत होतं'.
View this post on Instagram
हिंदूं धर्माला चुकीच्या पद्धतीने दाखविल्याचाआरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निर्माता-दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यावर शाई फेकली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडफेकीत टीमच्या दोन बसच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या आहेत. या वेब सिरीजचे शूटिंग पुढे जाऊ देणार नाही, अशी धमकीही त्यांनी दिली असल्याचं म्हटलं जात आहे जात आहे.
घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितलं की, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आश्रम या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणारा प्रकाश झा आणि बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली. पत्रकारांशी बोलताना बजरंग दलाचे राज्य निमंत्रक सुशील सुरहेले म्हणाले की, त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते भोपाळमध्ये 'आश्रम'चे शूटिंग होऊ देणार नाहीत.
(वाचा:महेश मांजरेकरांनी कॅन्सरशी लढा देत केली Antimची शूटिंग;सलमानने सांगितलं....)
याबद्दल बोलताना सुशील सुरहेले यांनी म्हंटल, “प्रकाश झा यांनी त्यांच्या मागील भागात गुरूंकडून महिलांचे होणारे शोषण दाखवून हिंदू आश्रमातील व्यवस्था चुकीच्या पद्धतीने दाखवली होती. गेल्या हजार वर्षांपासून सनातन धर्मात असे आश्रम आहेत ज्यांनी सामाजिक मूल्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या वेब सिरीजमध्ये जे दाखवले आहे त्यात तथ्य नाही. आम्ही प्रकाश झा यांच्या चेहऱ्यावर कळिक असून. आता आम्ही बॉबी देओलला शोधत आहोत'.
(वाचा:Bigg Boss 15:काम्या पंजाबीने केली जय भानुशालीची पाठराखण! तर शमिता शेट्टीला दिला)
प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाने एका निवेदनात म्हटलं आहे की, "अनेक अराजक घटक बेकायदेशीरपणे अडथळा आणतात आणि त्यांना शिक्षेची भीती नसते." या निवेदनात म्हटले आहे की, "या हिंसाचारातील दोषींवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे." महासंघाने शासनाकडे न्यायाची मागणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Web series