Aashram रिलीज होताच अडचणी वाढल्या; प्रकाश झा, बॉबी देओलविरोधात पोलिसात तक्रार

Aashram रिलीज होताच अडचणी वाढल्या; प्रकाश झा, बॉबी देओलविरोधात पोलिसात तक्रार

Aashram chapter 2 चा टिझर रिलीज झाल्यापासूनच या वेब सीरिजला सोशल मीडियावर विरोध होत होता.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल स्टारर (Bobby Deol) वेब सीरिज आश्रमचा (Aashram) दुसरा सीझन आज रिलीज झाला आणि आता अडचणी अधिक वाढल्या आहेत. आतापर्यंत सोशल मीडियावर या सीरिजला विरोध होत होता आता मात्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Aashram  chapter 2 चा टिझर प्रदर्शित झाल्यापासून या वेब सीरिजला विरोध होऊ लागला. हिंदू धर्माच्या भावनांना यामुळे ठेच पोहोचवल्याचा आरोप होतो आहे. या सीरिजमधून हिंदू धर्माचा चुकीचा प्रचार होत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या होत्या. सोशल मीडिया युझर मोठ्या प्रमाणात त्यांचा राग विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त करत होता.

दरम्यान आता या वेब सीरिजचे निर्माता प्रकाश झा (Prakash Jha) आणि अभिनेता बॉबी देओल यांच्यासह वेब सीरिजशी संबंधित अनेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. करणी सेनेनं मुंबई पोलिसात ही तक्रार दिली आहे. करणी सेनेच्या मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष डॉ. ऋचा सिंह देवल यांनी बंगूर-नागर पोलीस ठाण्यात ही तक्रार केली आहे.

एमएक्स प्लेअरवरील 'आश्रम' ही सीरिज आहे. बॉबी देओल यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. त्याने 'काशीपूरवाले बाबा निराला' ही भूमिका साकारली आहे.

Published by: Priya Lad
First published: November 11, 2020, 7:40 PM IST

ताज्या बातम्या