Home /News /entertainment /

'आशिकी' फेम राहुल रॉय ICU मध्ये दाखल; शूटिंगदरम्यान Brain Stroke मुळे कोसळला

'आशिकी' फेम राहुल रॉय ICU मध्ये दाखल; शूटिंगदरम्यान Brain Stroke मुळे कोसळला

या चित्रपटाच्या शूटिंगमुळे त्याला ब्रेन स्ट्रोक आल्याचे सांगितले जात आहे, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे

    मुंबई, 29 नोव्हेंबर : सुपरहिट चित्रपट 'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉय याला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ब्रेन स्ट्रोकचा झटका (Aashiqui fame actor rahul roy suffers brain stroke) आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर तातडीने त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आले आहे. राहुल रॉय 'LAC-लिव्ह द बॅटल' चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. राहुल रॉयच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी सांगितलं की, त्याच्या मेंदूच्या डाव्या भागात रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. तो बरा होण्यासाठी वेळ लागू शकतो. 'LAC-लिव्ह द बॅटल' या चित्रपटाचं शूटिंग खूप उंचीवर सुरू होतं. त्यामुळे तेथे ऑक्सिजनची कमतरता होती आणि टीम सदस्यांनाही श्वास घेण्यात त्रास जाणवत होता. हे ही वाचा-कॅन्सर सांगून तरुणी गेली हनिमूनला; लाखोंची उधळपट्टी करुन तुरुंगात होणार रवानगी राहुल रॉय याने 1990 साली 'आशिकी' चित्रपटाद्वारे पदार्पण केले. या चित्रपटामुळे त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली की त्याने यानंतर थेट 47 चित्रपट साईन केले. पण 'आशिकी' नंतर राहुल रॉयची जादू कमी झाली. आणि तो प्रसिद्धीपासून दूरावला. यानंतर बिग बॉसचा सिजन 1 जिंकल्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला. मात्र, बिग बॉसनंतरही त्यांची जादू फार चालू शकली नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या