मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aashiqui 3: एका सिनेमामुळे बदललं साऊथ अभिनेत्रीचं आयुष्य; बॉलिवूडच्या मोठ्या हिरोइन्सना टाकलं मागे

Aashiqui 3: एका सिनेमामुळे बदललं साऊथ अभिनेत्रीचं आयुष्य; बॉलिवूडच्या मोठ्या हिरोइन्सना टाकलं मागे

आशिकी 3

आशिकी 3

कार्तिक आर्यन सध्या बॉलिवूडमधील सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्यांपैकी एक बनला आहे. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्याची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 30 सप्टेंबर-   कार्तिक आर्यन सध्या बॉलिवूडमधील सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्यांपैकी एक बनला आहे. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्याची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. कार्तिक आगामी काळात अनेक मोठमोठ्या प्रोजेक्टसमध्ये झळकणार आहे. त्यातीलच एक म्हणजे 'आशिकी 3' होय. नुकतंच कार्तिक आर्यनने आशिकी 3 चा मोशन पोस्टर रिलीज करत आपली या चित्रपटात वर्णी लागल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर चाहते प्रचंड आनंदी झाले होते. मात्र आता चाहत्यांना कार्तिकसोबत या चित्रपटात कोणती अभिनेत्री दिसणार याची उत्सुकता लागली आहे.

अभिनेता सिद्धार्थ रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या 'आशिकी 2' या चित्रपटाला लोकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. या चित्रपटातील प्रत्येक सीन आणि गाण्याला लोकांनी भरभरून दाद दिली होती. या चित्रपटातील गाणी आजही तितक्याच आवडीने गुणगुणली जातात. खरं तर हा चित्रपट 1990मध्ये आलेल्या 'आशिकी' चित्रपटाचा रिमेक होता. यामध्ये अनु कपूर आणि राहुल रॉय यांनी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील गाण्यांनी लोकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या चित्रपटाच्या दोन्ही भागाच्या अफाट यशानंतर आता 'आशिकी 3' देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा खूप आधी झाली होती.

( हे वाचा: Varun Dhawan: 'सलमान खानने ओटीटीवर एन्ट्री करू नये' असं का म्हणाला वरुण धवन?)

'आशिकी 3' या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर अभिनेत्री कोण दिसणार याची बरीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण, क्रिती सेनन आणि श्रद्धा कपूर यांच्या नावाची चर्चा होती. आता या चित्रपटात रश्मिका मंदाना दिसणार आहे. नुकतंच याबाबतच वृत्त समोर आलं आहे. याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी रश्मिकाचं नाव फायनल झाल्याचं सांगण्यात येत आहे.

या चित्रपटात कोणती अभिनेत्री दिसणार ही चर्चा जोरात सुरु होती. 'आशिकी 3' चं मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासून या चित्रपटासाठी श्रद्धा कपूर, दीपिका पादुकोण आणि क्रिती सेनन यांची नावे चर्चेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता या चित्रपटासाठी रश्मिका मंदानाचे नाव निश्चित करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

आता या चित्रपटात नॅशनल क्रश रश्मिका मंदाना कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. याआधी आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर आशिकी 2 मध्ये दिसले होते. या चित्रपटाला लोकांनी प्रचंड प्रेम दिलं होतं. ही जोडी सुपरहिट ठरली होती.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Kartik aryan, Rashmika mandanna