मुंबई 10 जुलै : लिटिल चॅम्प्स ते जज असा प्रवास करणारी महाराष्ट्राची लाडकी गायिका म्हणून प्रसिद्ध असलेली आर्या आंबेकर (Aarya Ambekar) सध्या फारच चर्चेत आहे. नुकताच झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ (Sa Re Ga Ma Pa little champs) हा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यात आर्या परिक्षकाची भूमिका बजावत आहे.
आर्याचा या आठवड्यात धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिचं गाणं ऐकण्यासाठी श्रोते ही उत्सुक आहेत. ‘श्रावणात घन निळा बरसला’ हे मधुर गाणं आर्या गाणार आहे. गाण्याच्या प्रोमोवर तिला चांगला प्रतिसाद मळत आहे.
View this post on Instagram
आपल्या आवाजानेच नाही तर सौंदर्यानेही आर्याने चाहत्यांवर जादू केली आहे. तिच्या लुकवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. गायिकाचं नाही तर आर्या अभिनेत्रीही आहे. ती सध्या काय करते या चित्रपटातही ती झळकली होती.
कार्यक्रमाची एकूणच सुरुवात अतिशय दमदार दिसून येत आहे. एकूण स्पर्धकांपैकी सगळेच स्पर्धक हे अटीतटीचा सामना खेळत आहेत. या लहानग्यांचे आवाज प्रेक्षकांच्या कानांना मंत्रमुग्ध करत आहेत.
View this post on Instagram
पहिल्या पर्वातील पंचरत्न म्हणजेच कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे हे पाचही जण आता या लहान स्पर्धकांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत.
'अकेले हम अकेले तुम' आमिरच्या भावाचाही झाला घटस्फोट; पत्नीने केले होते हिंसाचाराचे आरोप
याशिवाय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayi Deshpande) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. लिटिल चॅम्प्स सोबत तिची चांगली गट्टीही जमली आहे.
अद्याप एलिमिनेशन राऊंड सुरू झाला नसला तरीही स्पर्धा अटीतटीची पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांकडूनही कार्यक्रमाला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.