VIDEO : महिलाच्या सद्यस्थितीवर आराध्यानं दिलं भाषण, अमिताभ बच्चनही झाले हैराण

VIDEO : महिलाच्या सद्यस्थितीवर आराध्यानं दिलं भाषण, अमिताभ बच्चनही झाले हैराण

सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यात आराध्या देशातील महिलांच्या सद्यस्थितीवर बोलताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 22 डिसेंबर : अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन तिचे आजोबा अमिताभ बच्चन यांच्यसारखीच इम्प्रेसिव्ह आहे. हे आम्ही सांगत नाही तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ याचा पुरावा आहे. आराध्या बच्चन बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यात आराध्या देशातील महिलांच्या सद्यस्थितीवर बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ आराध्याच्या शाळेतील फंक्शनचा आहे.

धीरुभाई अंबानी स्कूलमध्ये शिकणाऱ्या आराध्याच्या शाळेचं अ‍ॅन्युअल फंक्शन नुकतंच पार पडलं. ज्याला संपूर्ण बच्चन कुटुंबानं हजेरी लावली. कुटुंबाच्या समोर आराध्यानं सर्वांना जो संदेश दिला तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘मी एक मुलगी आहे... मी एक स्वप्न आहे... नव्या युगाचं स्वप्न... आम्ही एका वेगळ्याचं जगात जगणार आहोत... एक असं जग जिथे मी सुरक्षित राहणार आहे... माझ्यावर प्रेम केलं जाईल, माझा सन्मान केला जाईल... एक अशा जागा जिथे माझ्या आवाज अहंकाराखाली दाबला जाणार नाही... माझा आवाज, बोलणं समजूतदारपणे ऐकून घेतलं जाईल... एक असं जग जिथे ज्ञान जीवनाच्या पुस्तकातून येईल...’

या माकडासारखं तुम्हाला कोणी मिठीत घेणारच नाही! अनुपम खेर यांनी शेअर केला VIDEO

आराध्यानं आत्मविश्वासानं हे भाषण केलं. या व्हिडीओमध्ये ती खूपच एक्सप्रेसिव्ह दिसत आहे. हा मेसेज देताना तिच्या चेहऱ्यावर करारी भाव दिसत आहेत. हा व्हिडीओ आराध्याच्या एका फॅनपेज वरून शेअर करण्यात आला आहे. तिचा हा व्हिडीओ सर्वांनाच खूप आवडलेला दिसत आहे.

Bigg Boss 13 : सिद्धार्थ शुक्ला घेतो ड्रग्स? रश्मि देसाईच्या आरोपानं खळबळ

यावेळी आराध्या लाल, हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसली. यासोबतच तिनं केसांचा अंबाडा बांधून त्यावर गजरा लावला होता. या लुकमध्ये ती फारच क्यूट दिसत होती.

ऐकावं ते नवलच! कामाच्या व्यापात अंघोळ करायची विसरली अभिनेत्री, ट्विटरवर लिहिलं..

Published by: Megha Jethe
First published: December 22, 2019, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading