Home /News /entertainment /

BIG B यांची नात आराध्या बच्चनच्या VIDEO ने घातलाय धुमाकूळ; तुम्ही पाहिलात का?

BIG B यांची नात आराध्या बच्चनच्या VIDEO ने घातलाय धुमाकूळ; तुम्ही पाहिलात का?

आराध्या बच्चनचा एक क्युट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  मुंबई, 24 फेब्रुवारी: आराध्या बच्चन (aaradhya bachchan) ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. तिचे फोटो, व्हिडीओ नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. आता अशाच एका व्हिडीओने सोशल मीडियावर सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि हा व्हिडीओ सर्वत्र चर्चेचा विषय देखील ठरतो आहे. या व्हिडीओमध्ये आराध्या आई ऐश्वर्या राय आणि वडील अभिषेक बच्चन यांच्यासोबत डान्स करताना दिसून आली. आराध्या बच्चन अलिकडेच आई ऐश्वर्या राय आणि वडील अभिषेक बच्चन यांच्यासोबत फॅमिलीतील एका लग्नासाठी गेली होती. ऐश्वर्या रायचा चुलत भाऊ श्लोक शेट्टीचा हा लग्न समारंभ होता. त्यावेळी ‘देसी गर्ल’ या गाण्यावर बच्चन कुटुंब नाचताना दिसून आलं आहे. त्यावेळी आराध्यानंही ताल धरला.
  9 वर्षीय आराध्याचा डान्स खूप चाहत्यांना आवडला असून त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंट्स आणि लाईक येत आहेत.
  ऐश्वर्या राय आपल्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. आणि नेहमीच चाह्त्यांसोबत  फोटो शेअर करत असते.

  हे वाचा -    'आता मला शिव्या खायला तयार राहावं लागणार', अभिनेता शशांक केतकरने नेमकं केलं तरी काय? ऐश्वर्याने या लग्न समारंभातले फोटो सुद्धा शेअर केले आहेत. सोबत हेसुद्धा नमूद केलं आहे की अभिषेक या सोहळ्याला फक्त एकच दिवस उपस्थित राहू शकला होता. त्यामुळे तो फोटोमध्ये नाही.
  Published by:news18 desk
  First published:

  Tags: Abhishek Bachchan, Viral video., ऐश्वर्या राय बच्चन

  पुढील बातम्या