अक्षय कुमारनं 10 मिनिटात सिनेमाला दिला होकार, मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क

अक्षय कुमारनं 10 मिनिटात सिनेमाला दिला होकार, मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क

या सिनेमासाठी अक्षयन तगडं मानधन घेतल्याच्याही चर्चा सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी : अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘लक्ष्मी बॉम्ब’मुळे खूप चर्चेत आहे. या सिनेमात तो कियारा अडवाणीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. याशिवाय तो ‘बच्चन पांडे’ आणि ‘बेल बॉटम’ध्येही दिसणार आहे. त्यानंतर आता अक्षयनं आणखी एक सिनेमा साइन केला आहे. या सिनेमासाठी अक्षयन तगडं मानधन घेतल्याच्याही चर्चा सुरू आहेत.

अक्षय कुमार आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात अक्षय सोबतच सारा अली खान आणि साउथ सुपरस्टार धनुष हे सुद्धा असणार आहेत. सुरुवातीला अक्षय कुमारच्या जागेवर ऋतिक रोशन दिसणार होता मात्र आता अक्षयनं त्याला रिप्लेस केलं आहे. सारा या सिनेमातून पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या सिनेमासाठी 120 कोटींचं मानधन घेतल्याची चर्चा आहे. मात्र अक्षय किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

कोणी 36 व्या वर्षी लग्न केलं तर कोणी 60 व्या वर्षी, नावं वाचून बसेल धक्का

या सिनेमाबाबत बॉम्बे टाइम्सशी बोलताना अक्षय म्हणाला, आनंद एल राय यांच्यासोबत काम करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. ज्याप्रकारे ते एखादी कथा मोठ्या पडद्यावर मांडतात ते खरंच प्रशंसनिय आहे. जेव्हा त्यांनी मला या सिनेमासाठी विचारलं तेव्हा मी अवघ्या 10 मिनिटात या सिनेमाला होकार दिला. ही एक आव्हानात्मक भूमिका आहे. माझ्यासाठी हा खूपच स्पेशल रोल आहे. त्यामुळे मी या सिनेमाला नकार देऊ शकलो नाही.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार आता Man vs Wild मध्ये, बीयर ग्रील्ससोबत करणार जंगल सफर

अक्षय पुढे म्हणाला, हा सिनेमा मला नेहमीच लक्षात राहिल. धनुष आणि सारासोबत माझं कॉम्बिनेशन या सिनेमाच्या टायटलला सत्यात उतरवेल. मला माहित आहे की आनंद यांची स्टोरी सांगण्याची साधी आणि स्पेशल पद्धत यात जादू निर्माण करेल. त्यामुळे मी हा सिनेमा एवढ्या कमी वेळात स्वीकरला.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर यावर्षी त्याचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय वर्षाच्या अखेरीस त्याचा ‘बच्चन पांडे’ सुद्धा रिलीज होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्यानं त्याच्या चाहत्यांना पुढच्या वर्षांची वाट पाहावी लागणार आहे. आमिर खानसाठी अक्षयनं त्याच्या ‘बच्चन पांडे’ची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. याशिवाय ‘बेल बॉटम’ हा त्याचा आणखी एक सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होत आहे.

गुरुद्वाराबाहेर तरुणाने काढली तापसीची छेड, रागात अभिनेत्रीने बोट धरलं आणि...

First published: January 30, 2020, 2:50 PM IST

ताज्या बातम्या