मुंबई, 23 मार्च- बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाचा अभिनेता इमरान खान त्याच्या बायकोपासून वेगळा राहत असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगली होती. आता इमरान खान आणि त्याची बायको अवंतिका मलिक यांचा घटस्फोट झाल्याचं बोललं जात आहे. त्याला कारणही तसंच आहे, अवंतिकानं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टमुळं दोघांचा घटस्फोट झाल्याची बोललं जात आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
अवंतिका मलिकनं इन्स्टा स्टोरीमध्ये पॉप-स्टार मायली सायरसचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, घटस्फोट त्याच्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट होती..असचं म्हणतं आहे..असं देखील तिनं म्हटलं आहे. . मात्र, चाहत्यांनी तिची ही पोस्ट तिच्या आयुष्याशी जोडून पाहिली आणि त्यानंतर इमरान आणि अवंतिका यांच्या घटस्फोटाचे वृत्त येऊ लागले. इमरान खान आणि अवंतिका मलिक यांनी अद्याप या वृत्तांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच ते एकमेकांपासून वेगळे होण्याबाबत काहीही बोललेले नाहीत.
वाचा-बिग बींच्या मेकअप आर्टिस्टकडे 1.4 लाखांचा फोन, दादर स्टेशनवर घेऊन गेला अन्...
अवंतिका मलिकच्या सोशल मीडियावरील पोस्ट बर्याचदा लोकांचे लक्ष वेधून घेतात. दोघे बऱ्याच महिन्यांपासून एकत्र दिसले नाहीत. एकत्र कोणतीही पोस्ट नाहीत. इमरान खान अभिनेत्री लेखाला डेट करत असल्याची चर्चा आहे. या सगळ्यानंतर अंवतिका मलिकची ही पोस्ट समोर आली आहे. लेखाचे पती पाब्लो चटर्जी आणि इमरान खान खूप चांगले मित्र होते.'मटरू की बिजली का मन डोला'मध्ये तिने इमरानच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इमरान खानची पत्नी अवंतिका मलिक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यानंतर तो फारसा कुठल्या चित्रपटात दिसला नाही. पण मागच्या काही काळापासून इम्रान त्यांच्या पत्नीसोबत बिघडलेल्या संबंधांमुळे चर्चेत आहेत.
इमरान खान आणि अवंतिका मलिक यांनी 2011मध्ये लग्न केलं होतं 2014 मध्ये अवंतिकाने मुलीला जन्म दिला. पण 2019 मध्ये मात्र दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि ते वेगवेगळे राहू लागले. मीडिया रिपोर्टनुसार अवंतिका आणि इमरान आता एकत्र राहत नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment