तिने शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे, “अगत्सुचा उद्देश्य संतुलन शोधणं ही आहे. संतुलन शोधण्यासाठी माझा हा लहानसा प्रयत्न आहे. जीवन माझ्यासाठी तसेच तुमच्यासाठी चांगल बनवण्याचा माझा प्रयत्न आहे.” त्यानंतर तिने कॅप्शन मध्ये लिहीलं आहे, ‘मी अभिमानाने तुमच्या समोर अगत्सु सादर करत आहे.’View this post on Instagram
आयराच्या या नव्या कामामुळे तिचे चाहते फारच आनंदी झाले आहेत. अनेकांनी तिला या कामासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. अगत्सुच्या सोशल मीडिया पेज वर एका व्यक्तीची कहानी देखिल मांडण्यात आली आहे. व मानसिक आरोग्य हे किती महत्त्वाचं आहे हे देखिल सांगितलं आहे.View this post on Instagram
मार्व्हलला पडली हिंदू संस्कृतीची भुरळ; बिग बजेट सुपरहिरोपटात झळकणार भारतीय
आयरा स्वतः देखिल डिप्रेशनची शिकार बनली होती. त्याचा अनुभव तिने स्वतःच सोशल मीडियावर शेअर केला होता. तर आता तिला इतरांनीही मदत करण्याची इच्छा आहे. आणि त्यासाठीच तिने अगत्सु फाउंडेशनची स्थापना केली आहे.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aamir khan, Entertainment