मुंबई, 11ऑक्टोबर: आपल्या समाजात पूर्वीपासूनच मानसिक स्वास्थ्याबद्दल फारसं बोललं जात नाही. काही अंशी आता परिस्थिती बदलत आहे. सोशल मीडिया (Social Media)वर सक्रीय असलेले लोकं मानसिक स्वास्थ्याबद्दल खुलेआमपणे बोलायला लागले आहेत. नुकताच World Mental Health Day झाला. यानिमित्ताने सामान्य नागरिक, डॉक्टर्स मानसिक स्वास्थ्याबद्दल सोशल मीडियावर व्यक्त झाले. यामध्ये सेलिब्रिटींचाही समावेश होता. या सेलिब्रिटींमध्ये एका स्टार कीड (Star Kid)चा सहभाग होता. सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan)ची मुलगी (Ira Khan) मानसिक स्वास्थ्याबद्दल व्यक्त झाली. इराने मानसिक स्वास्थ्याबद्दलचा एक व्हिडीओदेखील इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
इराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
इरा खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी इराचं कौतुक करत आहेत. या व्हिडीओमधून इरा आपल्या मानसिक अवस्थेबद्दल व्यक्त झाली. "गेल्या 4 वर्षांपासून मी डिप्रेशनमध्ये आहे. डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. माझी मानसिक अवस्था पहिल्यापेक्षा खूपच चांगली आहे". इरा पुढे म्हणाली, अनेक दिवसांपासून मानसिक स्वास्थ्याबद्दल मला काहीतरी करायचं होतं. पण नक्की काय करू हे समजत नव्हतं.
World Mental Health Day बद्दल इराने शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक लाइक्स मिळत आहेत. नेटकरी कॉमेन्ट्सच्या माध्यमातून इराचं कौतुक करत आहेत. मानसिक स्वास्थ्य हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पण त्याकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केलं जात आहे. जसे शरीराला आजार होतात आणि आपण न घाबरता ते डॉक्टरांना दाखवून त्यावर ट्रिटमेंट घेतो, त्याप्रमाणे मानसिक आजारांवरही योग्य वेळेतच उपचार होणं आवश्यक आहे.