VIDEO : जिमनॅस्टिक करताना गेला आमिर खानच्या मुलीचा तोल आणि...

VIDEO : जिमनॅस्टिक करताना गेला आमिर खानच्या मुलीचा तोल आणि...

बॉलिवूड अभिनेता आमीर खान (Aamir Khan) याची मुलगी इरा खानचा एक वर्कआउट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकजण अद्यापही आपापल्या घरीच आहेत. दरम्यान सध्या देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी अद्याप जिम सुरू झालेल्या नाही आहेत. अशावेळी सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांबरोबर जोडले जाण्यासाठी सोशल मीडियावर विविध व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांचे घरातील वर्कआउटचे व्हिडीओ देखील सेलिब्रिटी नेहमी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. बॉलिवूड अभिनेता आमीर खान (Aamir Khan) याची मुलगी इरा खानचा असाच एक वर्कआउट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आमीर खानची मुलगी इरा खान (Ira Khan)सोशल मीडियावर सक्रीय असते. जिमनॅस्टिक करतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो की व्हायरल होत आहे. इराने वर्कआउट करतानाचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये जिमनॅस्टिक रिंगवर ती वर्कआउट करत आहे.

दरम्यान पहिल्या व्हिडीओमध्ये तिचा जरासा तोल गेल्याने ती जोरात ओरडते. मात्र काही क्षणातच ती स्वत:ला सावरून वर्कआउट सुरु ठेवते च्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. इराचे वर्कआउट व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 18, 2020, 2:51 PM IST
Tags: aamir khan

ताज्या बातम्या