• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • आमिर खानचा बॉडीगार्ड आहे मराठमोळा युवराज घोरपडे; पगार ऐकून चाट पडाल!

आमिर खानचा बॉडीगार्ड आहे मराठमोळा युवराज घोरपडे; पगार ऐकून चाट पडाल!

आमिरचे चाहत्यांच्या गर्दीतले कित्येक फोटो आपण पाहिले असतील. या सगळ्यात तुम्हाला आमिर खानसोबत एक व्यक्ती नेहमीच दिसून येईल. ही व्यक्ती म्हणजे आमिरचा पर्सनल बॉडीगार्ड (Amir Khan Bodyguard) युवराज घोरपडे!

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर : बॉलिवूडमध्ये सुपरस्टार कोण म्हटल्यावर खान त्रयी डोळ्यासमोर येते. यातला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिरचे (Mr. Perfectionist Amir Khan) जगभरात कोट्यवधी फॅन्स आहेत. भारतात असो, वा विदेशात, आमिर खान जेव्हा कधी बाहेर जातो, तेव्हा त्याचे चाहते त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी करतात. आमिरचे चाहत्यांच्या गर्दीतले कित्येक फोटो आपण पाहिले असतील. या सगळ्यात तुम्हाला आमिर खानसोबत एक व्यक्ती नेहमीच दिसून येईल. ही व्यक्ती म्हणजे आमिरचा पर्सनल बॉडीगार्ड (Amir Khan Bodyguard) युवराज घोरपडे! आमिरची सुरक्षा व्यवस्था (Security of Amir Khan) सांभाळणं म्हणजे खायचं काम नाही. खासगी कार्यक्रम असो, वा सार्वजनिक सोहळा किंवा मग अगदी शूटिंगचं लोकेशन असो – आमिरला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी कायमच असते. खरं तर बॉलिवूडमधील सर्वच सुपरस्टार्सचे सुरक्षारक्षक प्रचंड मेहनत घेतात. त्यामुळे अर्थातच त्यांचा पगारही तेवढाच रग्गड असतो. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अनुष्का शर्मा आणि इतर काही सेलेब्सच्या बॉडिगार्ड्सची (Bollywood star’s bodyguard salary) सॅलरी जाहीर करण्यात आली होती. अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षारक्षकाच्या पगारावरून (Amitabh bachhan Bodyguard salary) तर काही काळ वादही निर्माण झाला होता. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याचा बॉडीगार्ड शेरा (Salman Bodyguard Shera) तर आता सर्वांच्याच परिचयाचा झाला आहे; पण मग आमिर खानच्या बॉडीगार्डचा (Amir Khan Bodyguard salary) पगार किती आहे? टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 'टाइम्स नाऊ'ने दिलेल्या माहितीनुसार, युवराज घोरपडेचा (Yuvraj Ghorpade Salary) वार्षिक पगार तब्बल 2 कोटी रुपये आहे. आमिरसारख्या सेलिब्रिटीची सुरक्षा पहायची म्हणजे एवढा पगार हवाच, नाही का? युवराजने (Amir Khan Bodyguard Yuvraj) 16व्या वर्षीच शाळेला रामराम ठोकला होता. घरच्या परिस्थितीमुळे तो पुढे छोटी-मोठी कामं करून पोट भरत होता. पुढे मग त्याने एका सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने आयुष्यात मागे वळून पाहिलं नाही. आज तो जगातल्या एका मोठ्या सुपरस्टारची सुरक्षा व्यवस्था सांभाळतो आहे. हे ही वाचा-आम्ही अजून लग्न नाही केलं...' म्हणत सलमानने केला आपल्या Longest रिलेशनशिपचा... दरम्यान, आमिर खानने नुकतंच लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर-खानही दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ते या चित्रपटाच्या सेटवर दिसले. त्या वेळी ते चित्रपटासाठीच्या वेशभूषेतच होते. सेटवर फोटो टिपण्यासाठी आलेल्या पापाराझी फोटोग्राफर्ससाठी त्यांनी काही पोझेसही दिल्या. करीना कपूरनेही आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून सेटवरचा एक फोटो पोस्ट करून चित्रीकरण पूर्ण झाल्याचं म्हटलं होतं.
  First published: