जेव्हा आमिर खान म्हणाला, 'मी ज्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकलो त्या झाल्या नंबर वन!'

जेव्हा आमिर खान म्हणाला, 'मी ज्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकलो त्या झाल्या नंबर वन!'

करिअरच्या सुरूवातीच्या काळात अनेकदा आमिर अभिनेत्रींच्या हातावर थुंकत असे. ज्यामुळे अनेक अभिनेत्रींकडून तक्रारी येत असत.

  • Share this:

मुंबई, 24 एप्रिल : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान फक्त त्याच्या भूमिका आणि डेडिकेशनसाठीच नाही तर करिअरच्या सुरुवातीला प्रँक्ससाठी सुद्धा प्रसिद्ध होता. एक वेळ अशी होती की करिअरच्या सुरूवातीच्या काळात अनेकदा आमिर अभिनेत्रींच्या हातावर थुंकत असे. ज्यामुळे अनेक अभिनेत्रींकडून तक्रारी येत असत. आमिरच्या या वागण्याचे अनेक किस्से आहेत.

आमिरनं इश्क सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी अभिनेत्री जूही चावलाला सांगितलं होतं की, त्याला भविष्य समजतं. त्यावर जूहीनं आपला हात दाखवला. जूहीनं असं करताच आमिर तिच्या हातावर थुंकला आणि तिथून पळून गेला. ही गोष्ट सर्व क्रू मेंबर्सच्या समोर झाल्यानं जूही चावलाला याचं खूप वाईट वाटलं. ती एवढी नाराज की, ती दुसऱ्या दिवशी शूटिंगला आलीच नाही. जूहीची नाराजी पाहून आमिरला सुद्धा खूप राग आला आणि त्यानंही तिच्याशी बोलणं बंद केलं. काही वर्षांनंतर त्यांच्यात सर्वकाही ठीक झालं मात्र जूही अद्याप ही गोष्ट विसरलेली नाही.

सोहा अली खानची लेक म्हणतेय गायत्री मंत्र, कोरोना दरम्यान व्हायरल झाला VIDEO

आमिरनं या व्यतिरिक्त दिल या सिनेमात माधुरी दीक्षितसोबत काम केलं होतं. या सिनेमातील 'खंबे जैसी खडी है' या गाण्याचं शूटिंग सुरू होतं. आमिरनं यावेळी माधुरीला सांगितलं की, तो हात पाहण्यात माहिर आहे. त्यावर माधुरीनं आपला हात त्याच्या हातात दिला जेणेकरुन तो तिला भविष्य सांगेल. यावर आमिरनं सुरूवातीला तर तिचा हात पाहिला आणि पुन्हा एकदा तेच केलं. यानंतर माधुरी हॉकी स्टिक घेऊन त्याला मारायला धावली होती.

राखी सावंतनं शेअर केला BIKINI PHOTO, सोशल मीडियावर बोल्ड टॅटूची चर्चा

View this post on Instagram

Imli and me

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

18 व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये जो जीता वहीं सिकंदरच्या रि-युनियनमध्ये आमिरच्या या सवयीबाबत चर्चा झाली होती. यावेळी फराह खान म्हणाली, आमिर करिअरच्या सुरूवातीच्या काळात अभिनेत्रींच्या हातावर थुंकत असे. तो सांगायचा दे मी तुझा हात वाचतो. ती अभिनेत्री हात पुढे करत असे आणि मग आमिर तिच्या हातावर थुंकत असे. त्यावर आमिर हसून म्हणाला, मी ज्या ज्या अभिनेत्रीच्या हातावर थुंकलो आहे ती प्रत्येक अभिनेत्री नंबर वन झाली.

संजय लीला भन्साळी तोडणार 'गंगूबाई काठियावाडी'चा सेट, वाचा काय आहे कारण

First published: April 24, 2020, 11:34 AM IST

ताज्या बातम्या