आमिर खानचा 'हा' व्हिडिओ व्हायरल, लहान मुलीकडून काम करून घेतल्यानं झाला ट्रोल

आमिर खानचा 'हा' व्हिडिओ व्हायरल, लहान मुलीकडून काम करून घेतल्यानं झाला ट्रोल

आमिर खाननं 1 मे ला कामगार दिनाचं निमित्त साधत श्रमदान केलं. या श्रमदानाचे काही फोटो व्हिडिओ त्यानं सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले.

  • Share this:

मुंबई, 2 मे : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या आमिर खाननं 1 मे ला कामगार दिनाचं निमित्त साधत श्रमदान केलं. पाणी फाउंडेशन अंतर्गत चालवण्यात आलेला त्याच्या या उपक्रमाला सोशल मीडियावरही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. एवढंच नव्हे तर मराठी सिने आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी त्याच्या या श्रमदानाच्या उपक्रमात भाग घेत हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला. या श्रमदानाचे काही फोटो व्हिडिओ आमिरनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. मात्र यातील एका व्हिडिओवरून त्याला ट्रोल करण्यात आलं.

आमिर खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर श्रमदानाचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तो एका लहान मुलीसोबत काम करताना दिसत आहे. ही मुलगी हातात कुदळ घेऊन माती खणताना दिसत आहे तर आमिर खान तिच्यासोबत ही माती बाहेर काढायला मदत करत आहे. मात्र या व्हिडिओमुळे कामगार दिनालाच एका लहान मुलीकडून काम करून घेतल्याचं म्हणत नेटीझन्सनी आमिरला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरनं लिहिलं आहे, 'बालमजुरी हा कायद्यानं गुन्हा आहे' तर दुसऱ्या युजरनं आमिरला लहान मुलीकडून काम करून घेत असल्याचं म्हणत आरोपी ठरवून टाकलं आहे. मात्र आमिरच्या चाहत्यांनी यामागचं कारण सांगण्याचा सल्ला दिला ज्यामुळे ट्रोलर्सची तोंड बंद होतील.
 

View this post on Instagram
 

Happy Mahashramdaan! #mejalmitra #paanifoundation @paanifoundation


A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी श्रमदान करताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांचा पुणे जिल्ह्यातल्या गावांमधला दौरा सोशल मीडियावर गाजला. पुरंदर तालुक्यात या दोघांनी पुरंदरची भेळ आणि ताज्या उसाच्या रसाचाही आनंद घेतला. त्याचे फोटो व्हायरल झाले होते. पुरंदरमधल्या जवळा अर्जुन या गावी महाश्रमदान शिबिर झालं, त्या वेळचे ते फोटो होते. जेजुरीला उतरल्यावर त्यानं सासवड रोडवरच्या जगताप वस्ती इथल्या टपरीवजा हॉटेल नागराजमध्ये थांबले. तिथं त्यांनी भेळ खाल्ली आणि उसाचा थंडगार रसही प्यायला.

प्रियांकाच्या दीराने लास वेगासमध्ये केलं Game Of Throne च्या अभिनेत्रीशी लग्न

कारगिल युद्धाच्या 'या' हिरोवर येतोय बायोपिकचं, सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार मुख्य भूमिकेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 07:03 PM IST

ताज्या बातम्या