मी पैशासाठी काहीही करू शकतो - आमिर खान

मी पैशासाठी काहीही करू शकतो - आमिर खान

'या सिनेमात मी एका ठगाची भूमिका केली आहे. जो ठग पैश्यासाठी काहीही करू शकतो. काहीही म्हणजे तो स्वतःच्या आईला पण पैश्यासाठी विकू शकतो.'

  • Share this:

19 एप्रिल : 'या सिनेमात मी एका ठगाची भूमिका केली आहे. जो ठग पैश्यासाठी काहीही करू शकतो. काहीही म्हणजे तो स्वतःच्या आईला पण पैश्यासाठी विकू शकतो.' अर्थात हे आमिरने त्याच्या आगमी सिनेमाबद्दल म्हटलं आहे. सगळ्यांना उत्सुकता असलेल्या ठग्स ऑफ हिंदुस्थान या सिनेमाच्या भूमिकेबद्दल अभिनेता आमिर खानने आपलं मौन सोडलं आहे.

'या सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी आहे. या भूमिकेचे वेगवेगळे पैलू आहेत. या सिनेमात कोणता सामाजिक मॅसेज नसून ही फक्त एक प्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक सिनेमा असणार आहे.' असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे. हा सिनेमा सगळ्यांसाठी अडव्हेंचर्स असणार आहे.

या सिनेमाशी निगडित अनेक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा आमिर खान नवीन भूमिकेत बघायला मिळणार, एवढं मात्र नक्की आहे. त्याच बरोबर या सिनेमामध्ये अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनयाचे बादशाहा म्हणजे बिग-बी अमिताभ बच्चनही असणार आहेत.

त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाबद्ल खूप उत्सुकता लागलेली आहे. हा सिनेमा बॉलिवूडच्या मोस्ट अवेटिंग लिस्ट मधला एक सिनेमा आहे असं म्हणायला हरकत नाही. पण प्रेक्षक या सिनेमाला किती पसंती देतात हे बघणंच महत्त्वाचं ठरणार आहे.

 

First published: April 19, 2018, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading