'ठग्स आॅफ हिंदोस्तान'वरच्या टीकेला आमिरनं दिलं 'असं' उत्तर

'ठग्स आॅफ हिंदोस्तान'वरच्या टीकेला आमिरनं दिलं 'असं' उत्तर

अनेकदा सिनेमांवर टीका झाली की त्यातले कलाकार मूग गिळून गप्प बसतात. पण अभिनेता आमिर खाननं या सगळ्या टीकेला उत्तर दिलंय.

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर : अामिर खान आणि अमिताभ बच्चन यांचा सिनेमा म्हटल्यावर पहिल्याच दिवशी 'ठग्स आॅफ हिंदोस्तान'बद्दल प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.  पण सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांची घोर निराशा झाली. सिनेमावर भरपूर टीका झाली. त्यावर थट्टाही खूप झाली.


अनेकदा सिनेमांवर टीका झाली की त्यातले कलाकार मूग गिळून गप्प बसतात. पण अभिनेता आमिर खाननं या सगळ्या टीकेला उत्तर दिलंय. तो म्हणाला, 'मला माहीत नाही सिनेमा यशस्वी होणार की नाही ते. पण आम्ही सगळ्यांनी आमच्याकडे जे उत्तम होतं ते सर्व सिनेमाला दिलंय.' आमिरनं म्हटलंय, गेली दोन वर्ष आम्ही या सिनेमावर काम करत होतो आणि सगळ्यांसाठी तो मोठा अनुभव ठरणार आहे.


यशराजचा हा सिनेमा 300 कोटींचा बनलाय. पहिल्या दिवसाची कमाई झालीय 50 कोटी. पहिल्या दिवसाच्या कमाईत सिनेमानं बाहुबलीलाही मागे टाकलंय. बाहुबलीनं पहिल्या दिवशी 40 कोटी कमावले होते, तर राम रतन धन पायोनं 39 कोटी. दिवाळी असल्यानं ठग्स आॅफ हिंदोस्तानचं अॅडव्हान्स बुकिंग झालं होतं. 2 लाख रुपयाचं अॅडव्हान्स बुकिंग होतं.


निर्मात्यांनी सिनेमाची कमाई वाढवण्यासाठी नवी शक्कल वापरली. ही बिझनेस स्टॅटर्जी याआधी रणबीर कपूरच्या ‘संजू’ चित्रपटात वापरण्यात आली होती. 'संजू' सिनेमाचं एकूण बजेट 100 कोटी होतं. राजकुमार हिरानीने ही बिझनेस स्टॅटर्जी वापरल्यानंतर चित्रपटानं जवळपास 350 कोटींची कमाई केली.


'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाची चर्चा आणि प्रेक्षकांमध्ये वाढलेली त्याची उत्सुकता पाहता सिनेमाच्या तिकिटाचे दर वाढवले आहेत. यशराज फिल्म प्राॅडक्शनने स्टॅटर्जीनुसार तिकिटांचे दर 10 टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संजू सिनेमाच्या तुलनेत या चित्रपटाच्या तिकिटांचे दर जास्त असणार आहेत. याशिवाय सिनेमाचं ऑनलाईन बुकिंग चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पाच दिवस आधी सुरू झालं. 8 नोव्हेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. पण 3 नोव्हेंबरपासून सिनेमाचं ऑनलाईन तिकीट मिळतंय.


...म्हणून राणादाच्या पाठकबाईंना ट्रॅडिशनल लुकच पसंत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2018 12:11 PM IST

ताज्या बातम्या