...जेव्हा आमिर खान किरण रावला विचारतो, आती क्या खंडाला? पाहा भन्नाट VIDEO

...जेव्हा आमिर खान किरण रावला विचारतो, आती क्या खंडाला? पाहा भन्नाट VIDEO

मिस्टर पफेक्शनिस्ट आमिर खानच्या (Aamir Khan) गाण्यावर किरण राव (Kiran Rao) थिरकली.

  • Share this:

मुंबई, 05 डिसेंबर: बॉलिवूडचे कलाकार नेहमीच काहीतरी हटके उद्योग करत असतात. अभिनेता आमिर खान (Aamir khan) हे त्याचं एक उदाहरण. आमिर खानने आत्तापर्यंत अभिनयाशी निगडीत वेगवेगळ्या क्षेत्राच्या वाटा चोखाळल्या आहेत. आमिर उत्तम अभिनेता तर आहेच. पण त्याने निर्मीती, दिग्दर्शनही केलेलं आहे. आमिर खान मस्तपैकी गाणंही म्हटलं आहे. आमिरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तो चक्क किरण रावला (Kiran Rao) "आती क्या खंडाला" म्हणताना दिसत आहे.

सलमान खानच्या (Salman Khan) बहिणीच्या लग्नाच्या वेळी हा व्हिडीओ काढण्यात आला आहे. यावेळी स्टेजवर सलमान खान, आमिर खान आणि मिका सिंह (Mika Singh) दिसत आहेत. मिक्का आमिरला गाणं म्हणण्यासाठी आग्रह करतो. आमिर खान आती क्या खंडाला हे गाणं म्हणायला सुरूवात करतो. तेव्हा सलमान खान खुर्चीवर बसलेल्या किरण रावला स्टेजवर बोलवतो. या व्हिडीओमध्ये किरण रावही आमिरच्या तालावर थिरकताना दिसली.

अर्पिता खान-शर्माचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात झालं होतं. तिच्या लग्नाला बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार आले होते. आमिर खानचा गुलाम सिनेमा  हीट झाला होता. त्यामधील आती क्या खंडाला हे गाणं तर अजूनही प्रेक्षकांच्या ओठावर आहे. अर्पिताचं लग्न 2014 साली झालं होतं. तिच्या लग्नाला नुकतीच आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. अर्पिताला आयुष नावाचा एक मुलगा असून एक छोटी मुलगीही आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 5, 2020, 7:24 PM IST

ताज्या बातम्या