'लाल सिंग चढ्ढा'चा First Look रिलीज, मजेदार अंदाजात दिसला आमिर खान

'लाल सिंग चढ्ढा'चा First Look रिलीज, मजेदार अंदाजात दिसला आमिर खान

'लाल सिंह चढ्ढा' सिनेमातील आमिर खानचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : आमिर खान आणि करिना कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'लाल सिंह चढ्ढा' हा सिनेमा मागच्या काही काळापासून खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता या सिनेमातील आमिर खानचा फर्स्ट लुक सुद्धा रिलीज झाला आहे. आमिरनं मजेशीर अंदाजातील त्याचा लुक सोशल मीडियावर शेअर केला.

सिनेमाच्या फर्स्ट पोस्टरवर आमिर खान लाल सिंह चढ्ढाच्या गेटअपमध्ये दिसत आहे. आमिरचा हा लुक खूप इंप्रेसिव्ह दिसत आहे. आमिरनं गुलाबी रंगाची पगडी घातली असून चेक्सचं शर्ट घातलं आहे. ज्याची बटणं वरपर्यंत लावलेली आहेत. या अवतारात आमिर खूपच मजेदार दिसत आहे.

आदित्य रॉय कपूरला बर्थडे विश करण्यासाठी दीपिका-रणबीरनं घेतले पैसे? पाहा VIDEO

या पोस्टरमध्ये आमिर कोणत्यातरी ट्रेनमध्ये बसलेला दिसत असून त्याच्या हातात मिठाईचा डबा आहे. सोशल मीडियावर हे पोस्टर पोस्ट शेअर करताना आमिरनं लिहिलं, 'सत श्री अकाल जी, मी आहे लाल.. लाल सिंह चढ्डा.' आमिरचा हा लुक सुरुवातीलाच लिक झाला होता. काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या सेटवरील फोटो लिक झाले होते त्यात आमिर खान सुद्धा लाल सिंह चढ्ढाच्या गेटअपमध्ये दिसला होता.

या सिनेमात आमिरसोबत अभिनेत्री करिना कपूर खान दिसणार आहे. याशिवाय 3 इडियट्स सिनेमातील अभिनेत्री मोना सिंह सुद्धा या सिनेमात दिसणार आहे. आमिर आणि करिनानं 1 नोव्हेंबर पासून चंदिगढमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. याशिवाय लुधियाना, अमृतसर आणि जलंधर सारख्या शहरात या सिनेमाचं शूट होणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी ख्रिसमसला रिलीज होणार आहे.

सिनेमातील लुकसाठी आमिर खूप मेहनत घेतली आहे. यासाठी त्यानं खरी-खुरी दाढी वाढवली आहे. हा सिनेमा 1994 मध्ये ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

रानू मंडलचा मेकओव्हर PHOTO VIRAL, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन घेणाऱ्या या अभिनेत्रींच्या नावावर हिट होतात सिनेमा!

=======================================================================

First published: November 18, 2019, 12:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading