...आणि आमिर खान शाहरुखच्या पार्टीतून न जेवताच परतला

...आणि आमिर खान शाहरुखच्या पार्टीतून न जेवताच परतला

अभिनेता आमिर खान नेहमीच प्रत्येक गोष्टी परफेक्ट करतो. तो एखाद्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाही.

  • Share this:

मुंबई, 28 मार्च : अभिनेता आमिर खान नेहमीच प्रत्येक गोष्टी परफेक्ट करतो. मग भूमिका किंवा सिनेमाची निवड असो वा त्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत. तो एखाद्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाही. एखाद्या भूमिकेसाठी जशीच्या तशी मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी आमिर किती मेहनत घेतो याचं प्रात्यक्षिक 'दंगल' सिनेमाच्यावेळी पाहायला मिळालं. दंगलमध्ये आमिरनं महावीर सिंह फोगाट यांची भूमिका साकारली होती. जे अगोदर कुस्तीपटू आणि नंतर आपल्या मुलींचे कुस्ती प्रशिक्षक बनतात. यावेळी आमिरला सुरुवातील वजन वाढवून नंतर जवळपास 30 किलो वजन कमी करायचं होतं. सिनेमाच्या शुटींग दरम्यान एक मजेशीर किस्सा घडला. दंगलचं शूटिंग सुरू असताना एकदा अभिनेता शाहरुख खान आमिरला पार्टीसाठी निमंत्रीत केलं होतं. या पार्टीला आमिर गेलाही मात्र तिथून जेवण न करताच परतला.

नुकत्याच एका कार्यक्रमात आमिरनं स्वतः या पार्टीतील एक मजेशीर किस्सा सांगितला. या कार्यक्रमात त्याला पार्टीला गेल्यावर तो तिथे जेवतो का असा प्रश्न विचारण्यात आला यावर आमिर सांगतो, 'मी माझ्या आरोग्याबाबत नेहमीच जागरुक असतो आणि मी माझा डाएट प्लान काटेकोरपणे पाळतो. मी नेहमी माझ्या सोबत माझा टिफीन घेऊन जातो. याबाबत एक मजेशीर किस्सा तुम्हाला शाहरुख सांगू शकेल. टिम कुक त्याच्या घरी आला होता तेव्हा शाहरुखनं मला जेवणासाठी बोलवलं होतं. गौरी मला म्हणाली जेवून जायचं आहे, मी म्हटलं ठीक आहे मी माझा टिफिन आणला आहे. यावर शाहरुख म्हणला माझ्या घरी औपचारिकतेची गरज नाही. जेव्हा मी माझा टिफिन उघडला त्यात डाळ, भात, भाजी आणि बरंच काही होतं ते पाहून सर्व अवाक झाले. त्यांना कळेना मी वजन वाढवत आहे की, कमी करत आहे.'

 

View this post on Instagram

 

Aamir, bugün Mumbai'de kendisine Dangal için düzenli kilo vermesine yardımcı olan Doktor Nikhil Dhurandhar'ın Fat Loss Diet kitabının lasmanınaydı. Aamir lasmanda doktorun kitabından ve Dangal için dönüşümünü anlattı. Ayrıca kitabın ön sözünü Aamir yazdı. ____________________ Haber çevirisi sayfamıza aittir. Lütfen etiket yaparak kullanın!! Follow 👉 @iaamirkhanx #aamirkhan #followforfollow #dangal #anushkasharma #bollywood #ranveersingh #imrankhan #dishapatani #parineetichopra #varundhawan #shahidkapoor #sonamkapoor #salmankhan #shahrukhkhan #sidharthmalhotra #aliaabhatt #shraddhakapoor #katrinakaif #jacquelinefernandez #kareenakapoor #deepikapadukone #mawrahocane #priyankachopra #ileanadcruz #adityaroykapoor #akshaykumar #hrithikroshan #aishwaryarai

A post shared by Aamir Khan Fan Turkey-turkish (@iaamirkhanx) on

आमिर आपल्या भूमिकेसाठी काय करु शकतो याचं हे एक चांगलं उदाहण होतं आणि म्हणूनच तो मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. लवकरच आमिर फॉरेस्ट गंप या हॉलिवूड सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात तो लाल सिंह चढ्ढा या सरदारजीची भूमिका साकारत असून या भूमिकेसाठी त्यानं नुकतंच 20 किलो वजन कमी केलं आहे.

First published: March 28, 2019, 1:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading