बर्थडे स्पेशल : आमिरने उलगडलं अभिषेक बच्चनच्या आयुष्यातलं 'हे' गुपित!

बर्थडे स्पेशल : आमिरने उलगडलं अभिषेक बच्चनच्या आयुष्यातलं 'हे' गुपित!

धूम, गुरू, पा, दिल्ली-6 अशा दमदार सिनेमांतून त्याने सिनेसृष्टी चांगलीच गाजवली. पण तुम्हाला माहित आहे का की, अभिषेकला लहानपणी मोठा आजार होता.

  • Share this:

05 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचा आज वाढदिवस आहे. धूम, गुरू, पा, दिल्ली-6 अशा दमदार सिनेमांतून त्याने सिनेसृष्टी चांगलीच गाजवली. पण तुम्हाला माहित आहे का की, अभिषेकला लहानपणी मोठा आजार होता.

अभिषेकच्या लहानपणीच्या आजाराचा खुलासा आमिर खानमुळे झाला. या आजारावर आमिरने सिनेमा बनवला. आणि तो प्रत्येकाच्या हृदयाला भिडलाही.

अभिषेक बच्चनला लहानपणी डिस्लेक्सिया हा आजार झाला होता. तो 'तारे जमीं पर' या सिनेमामधून आमिरनं सगळ्यांसमोर आणला. हा सिनेमा अभिषेकच्या आजारावर चित्रित करण्यात आला आहे.

अभिषेकने शाळा संपल्याबरोबरच अमेरिकेच्या बॉस्टन विद्यापीठाच्या बिझनेस कोर्समध्ये अॅडमिशन घेतलं पण अभिनयाची आवड जपण्यासाठी तो शिक्षण सोडून परत आला.

प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूरसोबत त्याने सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. पण अभिषेकचा सगळ्यात गाजलेला सिनेमा म्हणजे धूम. तब्बल 17 फ्लॉप सिनेमानंतर त्याचा हा सिनेमा सुपरहिट झाला होता. सध्या तो त्याच्या परिवारासोबत त्याचं यशस्वी आयुष्य जगत आहे. त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त न्यूज 18 लोकतच्या खूप खूप शुभेच्छा.

First published: February 5, 2018, 11:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading